एक्स्प्लोर

Sarfaraz Khan In Team India: आधी वजन कमी कर, वागणं सुधार, मगच टीम इंडियात मिळेल स्थान; सरफराजला BCCI अधिकाऱ्यानं सुनावले खडे बोल

Sarfaraz Khan In Team India: सरफराजचा टीम इंडियात समावेश न केल्यानं अनेकांनी बीसीसीआयवर टीकास्त्र डागलं होतं. अशातच आता बीसीसीआयनं नेमकं सरफराजला संघात का नाही स्थान दिलं? याचं एक कारण समोर येत आहे.

Sarfaraz Khan In Team India: टीम इंडिया (Team India) पुढच्या महिन्यात म्हणजेच, जुलैमध्ये वेस्ट इंडिज (West Indies Cricket Team) दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी दोन्ही संघांमध्ये टी20, एकदिवसीय आणि कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) कडून वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी एकदिवसीय आणि कसोटी संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये अनेक स्टार खेळाडूंना वगळण्यात आल्यामुळे बीसीसीआय अनेकांच्या टीकेचा सामना करावा लागत आहे. अशातच एका स्टार खेळाडूला वगळल्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी बीसीसीआयला खडे बोल सुनावले आहेत. यामध्ये दिग्गज खेळाडू सुनिल गावस्कर यांचाही समावेश होतो. ज्या स्टार खेळाडूला वेस्ट इंडिज दौऱ्यातून वगळल्यामुळे अनेक आजी-माजी खेळाडूंनी BCCI ला फैलावर घेतलं, तो खेळाडू म्हणजे, मुंबईचा स्टार फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan). 

सरफराजचा टीम इंडियात समावेश न केल्यानं अनेकांनी बीसीसीआयवर टीकास्त्र डागलं होतं. अशातच आता बीसीसीआयनं नेमकं सरफराजला संघात का नाही स्थान दिलं? याचं एक कारण समोर येत आहे. बीसीसीआयच्या एका सूत्रानं दावा केला आहे की, मुंबईचा स्टार फलंदाज सरफराजचा खराब फिटनेस आणि शिस्तीचा अभाव ही त्याला संघातून वगळण्यामागील प्रमुख कारणं आहेत.  

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 79.65 च्या सरासरीनं धावा 

फलंदाज सरफराजनं रणजी ट्रॉफीच्या मागील तीन हंगामात 2566 धावा केल्या आहेत. त्यानं आपल्या कारकिर्दीत फर्स्ट क्लास क्रिकेटच्या 37 सामन्यांमध्ये 79.65 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. अशा स्थितीत अंडर-19 विश्वचषकात दोन वेळा देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूला टीम इंडियामध्ये स्थान न देण्यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तर आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या ऋतुराज गायकवाडची भारतीय संघात निवड झाली आहे. ऋतुराज गायकवाडची फर्स्ट क्लास क्रिकेटमधील सरासरी जवळपास 42 च्या जवळ आहे. संघ निवडीशी संबंधित असलेल्या बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्यानं पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितलं की, "सरफराजकडे दुर्लक्ष करण्याचं कारण केवळ क्रिकेट नाही. त्याला टीम इंडियातून वगळल्याची अनेक कारणं आहेत." 

"सरफराजला स्वतःचं वजन करावं लागेल कमी"

"सलग दोन मोसमात 900 हून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूकडे दुर्लक्ष करण्यात निवडकर्ते मूर्ख आहेत का?", अला प्रश्नही बीसीसीआय अधिकाऱ्यानं केला आहे. संघात निवड न होण्यामागील एक प्रमुख कारण म्हणजे, सरफराजचा फिटनेस, जो आंतरराष्ट्रीय स्तराचा नाही. सरफराजला या बाबतीत कठोर परिश्रम करावे लागतील आणि वजन कमी करावं लागेल. उत्तम फिटनेससह त्याला पुनरागमन करावं लागेल. केवळ फलंदाजीचा फिटनेस हा निवडीचा एकमेव निकष नाही.", असंही पीटीआयशी बोलताना अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं. 

बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, फिटनेससोबतच सरफराज मैदानातील आणि मैदानाबाहेरील वर्तणुकीच्या निकषांवरही खरा उतरला नाही. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, "मैदानावर आणि मैदानाबाहेर त्याची वर्तणूक व्यवस्थित नव्हतं. त्यांचे काही शब्द आणि काही भाव शिस्तीच्या दृष्टिकोनातून उत्तम नव्हते. सरफराज त्याचे वडील आणि प्रशिक्षक नौशाद खान यांच्यासोबत या पैलूंवर काम करेल, अशी अपेक्षा आहे."

या वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीविरुद्धच्या रणजी सामन्यात दिल्लीविरुद्ध शतक झळकावल्यानंतर सरफराजनं केलेल्या आक्रमक सेलिब्रेशननं निवड समितीला नाराज केल्याचं बोललं जात आहे. दिल्लीविरुद्धच्या रणजी सामन्यात धमाकेदार कामगिरी केल्यानंतर सरफराजनं आक्रमकपणे सेलिब्रेशन केलं होतं. त्यावेळी निवड समितीचे तत्कालीन प्रमुख चेतन शर्मा स्टेडियममध्ये उपस्थित होते. यापूर्वी, 2022 च्या रणजी ट्रॉफीच्या फायनलदरम्यान त्याचं वागणं मध्य प्रदेशचे प्रशिक्षक आणि मुंबईचे माजी दिग्गज चंद्रकांत पंडित यांनाही खटकलं होतं. 

टीम इंडियाची वाट सरफराजसाठी अवघडच

बीसीसीआय अधिकाऱ्यांना सरफराजती आयपीएलमधील खराब कामगिरी आणि शॉर्ट बॉलसमोर त्याची उडणारी भंबेरी, त्याला असा निर्णय घेण्यास भाग पाडते का? असं विचारलं त्यावेळी ते म्हणाले की, "हा माध्यमांनी निर्माण केलेला गैरसमज आहे. मयंक अग्रवाल जेव्हा भारतीय कसोटी संघात आला, त्यावेळी त्यानं एकाच सीझनमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 1000 धावा केल्या होत्या. त्यावेळी एमएसके प्रसाद यांच्या समितीनं त्यांचा आयपीएल रेकॉर्ड पाहिला होता का? हनुमा विहारीसोबतही असंच झालं होतं. तोदेखील देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये आला होता. तेव्हा त्याच्या आयपीएल विक्रमाचा भारतीय संघात निवड करताना विचार केला गेला नाही. मग सरफराजच्या बाबतीत असं का व्हावं?" 

बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, सरफराजसाठी आता संघात जागा बनवणं खूपच अवघड असेल. ऋतुराज गायकवाडसोबत सुर्यकुमार यादवही टीम इंडियात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. दरम्यान, श्रेयर अय्यर जेव्हा दुखापतीतून सावरेल त्यावेळी संघात पुनरागमन करण्यासाठी तो प्रबळ दावेदार असेल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sarfaraz Khan: 80 ची सरासरी, 9 अर्धशतकं अन् 13 शतकं... तरीही सरफराजचं वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सिलेक्शन का नाही?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget