एक्स्प्लोर

Sai Sudharsan : पहिले कसोटी शतक हुकले, पण करिअरला मिळाली ‘नवसंजीवनी’! साई सुदर्शन वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर तुटून पडला

या सामन्यात यशस्वी जैस्वालने शानदार शतक ठोकले, पण आणखी एक खेळाडू होता ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तो म्हणजे साई सुदर्शन.

Sai Sudharsan Ind Vs Wi 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पहिला सामना जिंकून मालिकेत आघाडी घेतल्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीतही वरचढ दिसत आहे. या सामन्यात यशस्वी जैस्वालने शानदार शतक ठोकले, पण आणखी एक खेळाडू होता ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले तो म्हणजे साई सुदर्शन. या सामन्यातील खेळीमुळे साई सुदर्शनने आपल्या करिअरला अक्षरशः नवसंजीवनी दिली आहे. आतापर्यंत त्याला कर्णधार शुभमन गिल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्याला सारख्या संधी दिल्या, मात्र तो त्या संधींचा फायदा घेऊ शकला नव्हता. पण यावेळी त्याने अप्रतिम फलंदाजी करत सर्वांना सडेतोड उत्तर दिलं.

याआधी इंग्लंडमध्ये साई सुदर्शन सतत अपयशी ठरत होता. मग अहमदाबादमधील अपयशानंतर टीम इंडिया जेव्हा दिल्लीच्या मैदानावर उतरली, तेव्हा सुरुवात मंद गतीने झाली, पण मग यशस्वी जैस्वालसोबत साई सुदर्शननं अप्रतिम भागीदारी केली. दोघांनी मिळून 193 धावांची भागीदारी करत भारताची मजबूत पायाभरणी केली आणि साईला हरवलेला आत्मविश्वास परत मिळवून दिला.

साईच्या करिअरला मिळाली ‘नवसंजीवनी’

साई सुदर्शननं 165 चेंडूत 87 धावा केल्या आणि 12 चौकार मारले. शतक थोडक्यात हुकलं, पण आत्मविश्वासानं भरलेली ही खेळी त्याच्या करिअरसाठी सोन्याची संधी ठरली आणि टीकाकारांना दिलेला ठोस उत्तरही होती. यापूर्वी वेस्टइंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मिळालेल्या संधीचा साई फायदा घेऊ शकला नव्हता. अहमदाबादच्या सोप्या खेळपट्ट्यांवरसुद्धा त्याचा बॅट शांतच राहिला. परिणामी अनेक माजी खेळाडूंनी त्याच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले.  

साई सुदर्शन वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर तुटून पडला

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांनी चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावा केल्या. वॉरिकनने केएल राहुलला (38) बाद करून भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर यशस्वी आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 306 चेंडूत 196 धावांची भागीदारी केली. 165 चेंडूत 87 धावा करून साई बाद झाला.

हे ही वाचा -

IPL 2026 Auction Update : आयपीएलचा डिसेंबर धमाका! ऑक्शनची तारीख ठरली, खेळाडूंना कायम ठेवण्याची 'ही' शेवटची तारीख, CSK घेणार मोठे निर्णय? 

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: मतचोरीवरून निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात, बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित तब्बल 66 दिवसांनी राहुल गांधींचा हायड्रोजन बाॅम्ब कोणावर फुटणार?
मतचोरीवरून निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात, बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित तब्बल 66 दिवसांनी राहुल गांधींचा हायड्रोजन बाॅम्ब कोणावर फुटणार?
Uddhav Thackeray In Marathwada: शेतकऱ्यांनो शेतकरी म्हणून एकवट व्हा, जोपर्यंत तुम्ही एकवटत नाही, तोपर्यंत कोणी न्याय देणार नाही; उद्धव ठाकरेंची बांधावरून आर्त साद
शेतकऱ्यांनो शेतकरी म्हणून एकवट व्हा, जोपर्यंत तुम्ही एकवटत नाही, तोपर्यंत कोणी न्याय देणार नाही; उद्धव ठाकरेंची बांधावरून आर्त साद
Pune Leopard Attack: ड्रोन भिरभिरत गेला अन् रात्रीच्या अंधारात बिबट्याचा माग काढला, बेशुद्ध करायला डार्ट लागताच नरभक्षक चवताळला, नरभक्षक बिबट्या 'असा' संपला
ड्रोन भिरभिरत गेला अन् रात्रीच्या अंधारात बिबट्याचा माग काढला, बेशुद्ध करायला डार्ट लागताच नरभक्षक चवताळला, नरभक्षक बिबट्या 'असा' संपला
नातेवाईकांनी दोघांना अग्नी दिला,  दुसऱ्या दिवशी अस्थींची चोरी, नागपुरात खळबळ, नेमका प्रकार काय?
नातेवाईकांनी दोघांना अग्नी दिला, दुसऱ्या दिवशी अस्थींची चोरी, नागपुरात खळबळ, नेमका प्रकार काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर शेतकरी आक्रमक, सरकारकडे मदतीची मागणी
Marathwada Distress: 'आजच्या आज कर्जमुक्ती करा, Uddhav Thackeray यांचा सरकारला इशारा
Mirzapur Train Tragedy: रेल्वे रुळावर मृत्यूचं तांडव, चुकीच्या दिशेनं उतरल्यानं 4 प्रवाशांचा अंत
Mumbai Monorail: 'अपघात नाही, मॉकड्रिल होतं', MMRDA चा दावा, पण कर्मचारी संघटना अपघाताच्या वृत्तावर ठाम!
Maharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर 05 नोव्हेंबर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: मतचोरीवरून निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात, बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित तब्बल 66 दिवसांनी राहुल गांधींचा हायड्रोजन बाॅम्ब कोणावर फुटणार?
मतचोरीवरून निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यात, बहुचर्चित अन् बहुप्रतिक्षित तब्बल 66 दिवसांनी राहुल गांधींचा हायड्रोजन बाॅम्ब कोणावर फुटणार?
Uddhav Thackeray In Marathwada: शेतकऱ्यांनो शेतकरी म्हणून एकवट व्हा, जोपर्यंत तुम्ही एकवटत नाही, तोपर्यंत कोणी न्याय देणार नाही; उद्धव ठाकरेंची बांधावरून आर्त साद
शेतकऱ्यांनो शेतकरी म्हणून एकवट व्हा, जोपर्यंत तुम्ही एकवटत नाही, तोपर्यंत कोणी न्याय देणार नाही; उद्धव ठाकरेंची बांधावरून आर्त साद
Pune Leopard Attack: ड्रोन भिरभिरत गेला अन् रात्रीच्या अंधारात बिबट्याचा माग काढला, बेशुद्ध करायला डार्ट लागताच नरभक्षक चवताळला, नरभक्षक बिबट्या 'असा' संपला
ड्रोन भिरभिरत गेला अन् रात्रीच्या अंधारात बिबट्याचा माग काढला, बेशुद्ध करायला डार्ट लागताच नरभक्षक चवताळला, नरभक्षक बिबट्या 'असा' संपला
नातेवाईकांनी दोघांना अग्नी दिला,  दुसऱ्या दिवशी अस्थींची चोरी, नागपुरात खळबळ, नेमका प्रकार काय?
नातेवाईकांनी दोघांना अग्नी दिला, दुसऱ्या दिवशी अस्थींची चोरी, नागपुरात खळबळ, नेमका प्रकार काय?
जनतेचं गुडघाभर खड्ड्यात कंबरडं मोडलं, पण अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून आजी माजी खासदारांमद्ये क्रेडिटवरून जुंपली!
जनतेचं गुडघाभर खड्ड्यात कंबरडं मोडलं, पण अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या कामावरून आजी माजी खासदारांमद्ये क्रेडिटवरून जुंपली!
Pune Godwoman Fraud: भोंदूबाबाच्या नादाला लागून पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याच्या आयुष्याची राखरांगोळी, मुलींना गूढ शक्तीने बरं करण्यासाठी इंग्लंडमधील घर, फार्महाऊसही विकलं
भोंदूबाबाच्या नादाला लागून पुण्यातील उच्चशिक्षित दाम्पत्याच्या आयुष्याची राखरांगोळी, मुलींना गूढ शक्तीने बरं करण्यासाठी इंग्लंडमधील घर, फार्महाऊसही विकलं
Pune Leopard Attack: पुण्यातील पिंपरखेडमध्ये आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात सापडला, समोर माणसं दिसताच डरकाळी फोडली
पुण्यातील पिंपरखेडमध्ये आणखी एक बिबट्या पिंजऱ्यात सापडला, समोर माणसं दिसताच डरकाळी फोडली
Pune Crime Bhondu Baba: ...म्हणून तुमच्या मुली बऱ्या होत नाहीयेत, IT इंजिनिअर अन् शिक्षक पत्नीला भोंदूबाबनं कसं लुटलं, त्याच पैशांनी कोथरूडमध्ये विकत घेतला अलिशान बंगला
...म्हणून तुमच्या मुली बऱ्या होत नाहीयेत, IT इंजिनिअर अन् शिक्षक पत्नीला भोंदूबाबनं कसं लुटलं, त्याच पैशांनी कोथरूडमध्ये विकत घेतला अलिशान बंगला
Embed widget