Father's Day 2022: वडिलांच्या निधनानंतरही सचिन-कोहलीनं सोडलं नव्हतं मैदान!
Father's Day Special: जगभरात आज म्हणजेच 19 जून रोजी फादर्स डे साजरा केला जातोय. फादर्स डे (Father's Day 2022) दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो.
Father's Day Special: जगभरात आज म्हणजेच 19 जून रोजी फादर्स डे साजरा केला जातोय. फादर्स डे (Father's Day 2022) दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी साजरा केला जातो. सर्वात प्रथम 1910 मध्ये फादर्स डे साजरा करण्यात आला. दरम्यान, आज क्रीडा जगतातील दिग्गजांनीही फादर्स डेच्या निमित्तानं वडिलांना आदरांजली वाहिली. त्यापैकी काहींच्या वडिलांना जग सोडलं असून आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करत आहेत. अशा खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात.
वडिलांच्या निधाननंतर दुसऱ्याच दिवशी मैदानात उतरला विराट
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या वडिलांचं 2006 मध्ये निधन झालं. त्यावेळी विराट कोहली अवघ्या 18 वर्षाचा होता. आपल्या वडिलांच्या निधनानंतर विराटनं देशासाठी खेळण्याचं आपल्या कुटुंबाला वचन दिलं. कारण विराटनं देशासाठी क्रिकेट खेळावं हे त्याच्या वडिलांचं स्वप्न होतं, असं विराट कोहलीनं एका मुलाखातीदरम्यान सांगितलं होतं.विराटच्या वडिलांचं डिसेंबर 2006 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं, हे त्याच्या आयुष्यातील 'सर्वात प्रभावी' क्षण होता. त्या दिवसांत कोहली दिल्लीकडून रणजी ट्रॉफी खेळत होता. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोहली दुसऱ्या दिवशी वडिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाल्यानंतर पुन्हा खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.
क्रिकेटच्या मैदानातचं सचिननं वाहली त्याच्या वडिलांना श्रद्धांजली
भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला क्रिकेट देव म्हणून संबोधलं जातं. पण इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खूप मेहनत आणि समर्पण दाखवलं. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम करणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती, जेव्हा तो वडिलांच्या निधनानंतर काही दिवसांनीच मैदानावर खेळायला आला होता. तो काळ त्याच्यासाठी खूप कठीण होता. सचिन तेंडुलकरच्या वडिलांचं 1999 साली निधन झालं आणि त्यावेळी तो इंग्लंडमध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळत होता. या स्पर्धेतील झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी त्याला त्याच्या वडिलांबद्दल माहिती मिळाली, त्यानंतर तो लगेच भारतात परतला. त्यानंतर तो पुन्हा विश्वचषकात सहभागी होण्यासाठी इंग्लंडला गेला आणि तेथे पोहोचल्यानंतर त्याने केनियाविरुद्ध शतक झळकावून भारताला विजय मिळवून देत आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली. कारण, सचिन तेंडुलकरनं भारतासाठी क्रिकेट खेळावं आणि देशाचं नाव मोठं करावं, असं त्यांच्या वडिलांचं स्वप्न होतं.
हे देखील वाचा-
- भारत इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर, धोनी-कोहलीला नाही जमलं, त्या व्रिकमाला गवसणी घालण्याची ऋषभ पंतकडं संधी
- IND vs SA, 5th T20: पाचव्या टी-20 मध्ये उमरान किंवा अर्शदीपला संधी मिळणार? कसा असेल भारताचा संभाव्य संघ?
- Father's Day 2022: कोणी फळं विकली, कोणी रिक्षा चालवली तर कोण इलेक्ट्रिशियन! आज त्यांचीचं मुलं गाजवतायेत क्रिकेटचं मैदान