लोकल झालं वोकल! त्या अप्रतिम झेलची सचिन तेंडुलकरला भुरळ, आंतरराष्ट्रीय क्रिकेपटूंनाही केलं कौतुक, पाहा VIDEO
Viral video : सोशल मीडियावर सध्या एका झेलची चर्चा होत आहे. सचिन तेंडुलकरसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनाही या झेलची भूरळ पडली आहे.
Viral video : सोशल मीडियावर सध्या एका झेलची चर्चा होत आहे. सचिन तेंडुलकरसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनाही या झेलची भूरळ पडली आहे. व्हिडीओ पाहून तो फलंदाज बाद आहे की नाही, याचा अंदाज लावणे कुणालाही अवघड आहे. सचिन तेंडुलकर, मायकल वॉन आणि जिम्मी निशम यांनी हा व्हिडिओ शेअर करुन झेलचे कौतुक केले. हा झेल बेळगावमधील टिळकवाडी येथे झालेल्या एका लोकल स्पर्धेतील आहे. हा लोकल व्हिडीओतील तरुण आता जगभरात प्रसिद्ध झालाय. त्या तरुणाचं नाव किरण तरळेकर असे आहे.
बेळगावातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर सध्या श्री चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील एसआरएस हिंदुस्तान आणि साईराज वॉरियर्स या दोन संघांमध्ये सामना झाला. शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान किरण तरळेकर याने क्षेत्ररक्षणातील कौशल्याचे आणि अप्रतिम समय सूचकतेचे प्रदर्शन घडविताना सीमारेषेवर डोळ्याचे पारणे फेडणारा झेल टिपला. फलंदाजांने सीमारेषेबाहेर फटकाविलेला चेंडू किरण याने उंच उडी मारून हवेतच झेलला. मात्र चेंडू झेलण्याच्या प्रयत्नात आपण चेंडू हातात घेऊन सीमारेषा ओलांडणार आणि तसे झाल्यास तो षटकार ठरणार, हे लक्षात येताच किरण याने चेंडू पुन्हा हवेत फेकून सीमारेषेबाहेर जात पुन्हा तो चेंडू फुटबॉल किक प्रमाणे मैदानात लाथाडला. यावेळी दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला किरण याने झेल घेण्यास सांगितले. मैदानात असलेल्या त्याच्या सहकारी क्षेत्ररक्षकाने सफाईने झेल पकडून फलंदाजाला बाद केले. किरण तळेकर याने दाखविलेले क्षेत्ररक्षणातील हा चपळपणा आणि झेल घेण्याचे कौशल्य आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसे होते. त्यामुळे सोशल मीडियावर झेलाचीच चर्चा होताना दिसत आहे. किरण तरळेकर याने पकडलेल्या या अप्रतिम झेलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला असून किरणची सर्वत्र विशेष करून क्रिकेट प्रेमींमध्ये मुक्तकंठाने प्रशंसा होत आहे.
This is what happens when you bring a guy who also knows how to play football!! ⚽️ 🏏 😂 https://t.co/IaDb5EBUOg
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 12, 2023
भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने बेळगाव मधील व्हॅक्सिन डेपोवर सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेतील 'त्या' अफलातून झेलाचा व्हिडिओ आपल्या ट्विटर लिंकवर शेअर करत बेळगावच्या टेनिस बॉल क्रिकेटची दखल घेतली आहे. एवढेच नव्हे तर न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंनी देखील त्या झेलाबद्दल ट्विट केल्यामुळे बेळगावचे टेनिस बॉल क्रिकेट जगप्रसिद्ध झाले आहे.
Taking boundary catching to a whole new level...🏃♂️
— Omkar Mankame (@Oam_16) February 12, 2023
Via WhatsApp. pic.twitter.com/0r2Qcie3gX
सध्या शहरातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर श्री स्पोर्ट्स आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेच्या एसआरएस संघाविरोधाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात काल साईराज वॉरियर्सच्या किरण तरळेकर याने सीमारेषेवर अफलातून झेल पकडला होता. या झेलाचा सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी शेअर केला आहे. 'हे तेव्हाचं घडतं जेंव्हा ज्याला फुटबॉल देखील खेळता येतो, अशा खेळाडूला तुम्ही आणता' (दिस इज व्हॉट हॅपन्स व्हेन यू ब्रिंग अ गाय हू अल्सो नोस हाऊ टू प्ले फुटबॉल) अशा शब्दात किरण तळेकर यांनी पकडलेल्या झेलाचा व्हिडिओ सचिनने शेअर करत बेळगावच्या टेनिस बॉल क्रिकेटची दखल घेतली आहे.
Absolutely outstanding 👌👌😂 https://t.co/Im77ogdGQB
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) February 12, 2023
बेळगाव व्हॅक्सिन डेपो मैदानावर बेळगावच्या किरण तरळेकर याने सीमारेषेवर घेतलेला अप्रतिम झेल जगभर प्रसिद्ध झाला असून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह न्युझीलंड अष्टपैलू खेळाडू जिमी नीशम इंगलन आणि माजी कर्णधार मायकेल वान यांनी देखील त्याची दखल घेतली आहे.
It doesn't matter what the rules say.
— Cricket District (@cricketdistrict) February 12, 2023
You've got to give this out for the pure AUDACITY 🤯😂
Sent in by Kiran Tarlekar pic.twitter.com/pquwsLc5YC
Surely the greatest catch of all time … 🙌🙌 pic.twitter.com/ZJFp1rbZ3B
— Michael Vaughan (@MichaelVaughan) February 12, 2023