Vijay Hazare Trophy 2021-22 : विजय हजारे ट्रॉफीत या '5' फलंदाजांची हवा, पाहा संपूर्ण यादी
Vijay Hazare Trophy : भारतीय स्थानिक क्रिकेटमधील महत्त्वाची स्पर्धा असणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीत यंदा महाराष्ट्राच्या ऋतुराजचा जलवा दिसून आला त्याच्याशिवाय अजूनही काही फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली.
Vijay Hazare Trophy 2021-22 : भारतीय स्थानिक क्रिकेट टूर्नामेंटमधील एक महत्त्वाची स्पर्धा असणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीची (Vijay Hazare Trophy) नुकतीच सांगता झाली. हिमाचल प्रदेश संघाने तामिळनाडूच्या संघाला मात देत यंदाचा चषक पटकावला आहे. दरम्यान या स्पर्धेत महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने धमाकेदार फलंदाजी केली. तो सर्वात यशस्वी फलंदाज ठरला असून त्याच्याशिवाय अजूनही काही फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. या सर्व यादीवर एक नजर फिरवूया...
1. ऋतुराज गायकवाड - या टूर्नामेंटमध्ये महाराष्ट्र संघाचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने आयपीएल 2021 प्रमाणेच धडाकेबाज फलंदाजीचं दर्शन घडवलं. त्याने पाच सामन्यात तब्बल 603 धावा केल्या. ऋतुराजने 5 शतकं झळकावली असून 168 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.
2. रिषी धवन - या यादीत दुसऱ्या नंबरवर आहे विजयी संघ हिमाचल प्रदेशचा सलामीवीर रिषी धवन (Rishi Dhawan). धवनने 8 सामन्यात 458 धावा केल्या असून 91 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.
3. प्रशांत चोप्रा - विजयी संघ हिमाचल प्रदेशचा आणखी एक खेळाडू या यादीत असून प्रशांत चोप्रा असं त्याचं नाव आहे. त्याने 8 सामन्यात 456 धावा केल्या असून 99 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.
4. शुभम शर्मा - विजय हजारे ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेशच्या शुभम शर्माने (Shubham Sharma) संघासाठी काही सामन्याक धमाकेदार फलंदाजी केली. त्याने 418 धावा केल्या असून 108 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.
5. मनन वोरा - चंदीगड संघाचा कर्णधार मनन वोरा ( Manan Vohra) यानेही या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघातील युवा त्याने 5 सामन्यात 379 धावा केल्या असून 141 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- IND vs SA 1st Test : दुसऱ्या दिवशीचा खेळ तर रद्द झाला, आता तिसऱ्या दिवशी कसा असेल खेळ?
- Highest Paid Captain: क्रिकेटविश्वात सर्वाधिक मानधन घेणारा कर्णधार कोण? विराट कोहली कितव्या क्रमांकावर? पाहा संपूर्ण यादी
- Ashes : अॅशेस मालिकेत सर्वाधिक शतकं कोणाच्या नावावर?, सर डॉन ब्रॅडमननंतर 'या' खेळाडूंचा जलवा!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha