(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रोहित शर्माने मोडला सचिनच्या शतकांचा विक्रम, विश्वचषकात नवा रेकॉर्ड हिटमॅनच्या नावावर
Rohit Sharma, World Cup : रोहित शर्माने अफगाणिस्तानविरोधात सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम मोडला आहे.
Rohit Sharma, World Cup : रोहित शर्माने अफगाणिस्तानविरोधात सचिन तेंडुलकरचा सर्वात मोठा विक्रम मोडला आहे. विश्वचषकात सर्वाधिक शतक ठोकणारा फलंदाज म्हणून आता रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. रोहित शर्माने विश्वचषकातील सातवे शतक ठोकले. याआधी हा विक्रम सचिनच्या नावावर होता. सचिन तेंडुलकरने विश्वचषकात सहा शतके ठोकली आहेत. दरम्यान, रोहित शर्माने 63 चेंडूमध्ये शतकी खेळी केली. या खेळीमध्ये रोहित शर्माने 12 चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने शतक ठोकले आहे. विश्वचषकात सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर जमा झाला आहे. याआधी हा विक्रम कपिल देवच्या नावावर होता. कपिल देव यांनी 72 चेंडूमध्ये शतक ठोकले होते. हा विक्रम रोहितने मोडीत काढला आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) साठी 2019 चा विश्वचषक शानदार राहिला होता. या विश्वचषकात रोहित शर्माने पाच शतके ठोकली होती. तर 2015 च्या विश्वचषकात रोहित शर्माने एक शतक ठोकले होते. आता रोहित शर्माने विश्वचषकातील सातवे शतक ठोकत सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला आहे. विश्वचषकात सचिन तेंडुलकरने सहा शतके ठोकली होती. हा विक्रम रोहितने मोडला आहे.
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने अवघ्या 19 डावात सात शतके ठोकण्याचा विक्रम केला आहे. त्याशिवाय एक हजार धावांचाही पल्ला पार केला आहे. रोहित शर्माने 19 डावात विश्वचषकातील एक हजार धावांचा पल्ला पार केला. रोहित शर्माने आज क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे. सचिन तेंडुलकरने 44 डावात सहा शतके ठोकली होती. सचिन तेंडुलकरने सहा विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केले होते. सचिनचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम रोहित शर्माने मोडला आहे.
सर्वाधिक शतकांच्या बाबतीत आता सचिन तेंडुलकर दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा कुमार संगाकारा आणि ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग आहेत. दोघांच्या नावावर विश्वचषकात 5 शतके आहेत. ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. वॉर्नरने चार शतके ठोकली आहे. भारतीय कर्णधार सौरव गांगुलीही चार शतकासह पाचव्या क्रमांकावर आहे.
विश्वचषकात सर्वाधिक शतके ठोकणारे फलंदाज -
रोहित शर्मा सात शतके
सचिन तेंडुलकर सहा शतक
कुमार संगाकारा पाच शतके
सर्वाधिक षटकारांचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर -
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या विक्रम रोहित शर्माने केला आहे. अफगाणिस्तानविरोधात तिसरा षटकार मारताच रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज झाला आहे. रोहित शर्माच्या नावावर सध्या 555 षटकारांची नोंद झाली आहे. रोहित शर्माने 473 आंतरराष्ट्रीय डावात 555 षटकार मारले आहेत. रोहित शर्माने युनिवर्स बॉसचा विक्रम मोडीत काढला आहे. ख्रिस गेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकार ठोकले आहेत.
वर्ल्ड कपमध्ये एक हजार धावा -
रोहित शर्माने विश्वचषकातील एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे. 2015 आणि 2019 च्या विश्वचषकात रोहित शर्माने खोऱ्याने धावा काढल्या होत्या. रोहित शर्माने विश्वचषकाच्या 19 व्या सामन्यात एक हजार धावांचा पल्ला पार केला. विराट कोहलीच्या आधी तीन भारतीयांनी हा पराक्रम केला आहे. सचिन तेंडुलकर , विराट कोहली आणि सौरव गांगुली यांनी याआधी विश्वचषकात भारतासाठी एक हजार पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.