Murali Naik Jawan Martyrs : पाकड्यांशी लढताना जवान शहीद; जत्रेसाठी गावी गेलेल्या आईचा टाहो
Murali Naik Jawan Martyrs : पाकड्यांशी लढताना जवान शहीद; जत्रेसाठी गावी गेलेल्या आईचा टाहो
पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात युद्धाचे सायरन वाजले असून एअर स्ट्राईक आणि हवाई हल्ल्यांनी सीमारेषेवर घणाघात सुरू असल्याचे दिसून येते. भारतीय वायू दलाने पाकिस्तानी सैन्याचे दोन विमाने पाडले असून त्यांच्या कारवायांना हवेतच नेस्तनाबूत केलंय. दुसरीकडे सीमारेषेवर तणावाचे वातावरण असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. पूँछ, उरी सेक्टरमध्ये पाकड्यांना भारतीय सैन्य (indian army) दलाकडून चोख प्रत्त्युत्तर देण्यात येत आहे. मात्र, उरी सेक्टरमध्ये मुंबईतील मजूर बापाचा लेक जवान मुरली नाईक हे पाकिस्तान्यांशी लढताना शहीद (martyr) झाले आहेत. त्यांच्या वीरमरणाचे वृत्त गावी येताच, कुटुंबीयांनी टाहो फोडला. आपला तरणाबांड लेक गमावल्यानंतर आईच्या डोळ्यातील अश्रूंनी अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झाल्याचं पाहायला मिळालं. मुरली नाईक शहीद झाल्याचे वृत्त समजताच त्यांच्या आंध्र प्रदेशातील मूळ गावी स्थानिकांनी मोठी गर्दी केली आहे. तर, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी देखील ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली आहे.





















