Ind vs Aus 1st Test : BCCI ने केला शिक्कामोर्तब! रोहित शर्मा पर्थ कसोटीतून बाहेर, टीम मॅनेजमेंटने घेतला मोठा निर्णय
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा खेळणार नाही.
India vs Australia Perth Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पहिल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा खेळणार नाही. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रोहित शर्माने बीसीसीआयला याबाबत माहिती दिली आहे, त्याला त्याच्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवायचा आहे.
रोहितच्या अनुपस्थितीत संघाचा उपकर्णधार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघाची धुरा सांभाळणार आहे. रोहित 6 डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये सामील होईल, म्हणजेच तो दुसरा कसोटी सामना खेळणार आहे.
🚨UPDATE AHEAD OF BGT:
— 𝐂𝐂𝐑 (@CricComradeRaja) November 17, 2024
-BCCI Is Uncertain About Travelling Date Of Rohit, He Might Miss 1st Test Match.
-Padikkal Has Been Asked To Stay Back.
-BCCI Wants Shami To Play Few More Domestic Games.#RohitandRitika | #RohitSharma | #BGT | #INDvsAUS pic.twitter.com/FPIho3Fms2
टीम मॅनेजमेंटने घेतला मोठा निर्णय
रोहितच्या अनुपस्थितीमुळे भारतीय निवड समितीने भारत अ संघासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या देवदत्त पडिक्कलला फक्त ऑस्ट्रेलियातच राहण्यास सांगितले आहे. पर्थमधील ओपस स्टेडियमवर होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी रोहितच्या जागी पडिक्कलचा 18 सदस्यीय भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्हाला आशा आहे की रोहित ऑस्ट्रेलियाला जाईल, परंतु त्याने बीसीसीआयला कळवले आहे की त्याला आणखी काही वेळ हवा आहे, त्यामुळे तो आता जाऊ शकत नाही. ॲडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या गुलाबी चेंडूच्या कसोटी सामन्यासाठी तो ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये नऊ दिवसांचे अंतर आहे, त्यामुळे रोहित तिथे वेळेवर पोहोचेल.
🚨DEVDUTT PADIKKAL IN TEST TEAM🚨
— VIKAS YADAV (@VikasYadav66200) November 17, 2024
- Devdutt Padikkal is set to be added of Indian Test Team absence of Rohit Sharma and Shubhman Gill in first Test match. pic.twitter.com/Hum6UIthTi
बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जैसवाल मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.
हे ही वाचा -