Shreyas Iyer : खांदेपालट की हकालपट्टी...? अजिंक्य रहाणे नाही तर श्रेयस अय्यर असणार संघाचा नवा कर्णधार, पृथ्वी शॉलाही मिळाली संधी
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीच्या बैठक श्रेयस अय्यरला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेण्यात आला.
Shreyas Iyer To Lead Mumbai In Syed Mushtaq Ali Trophy : भारतीय संघाबाहेर असलेल्या श्रेयस अय्यरसाठी अलीकडचा रणजी हंगामा जबरदस्त ठरला आहे, आता त्याचे बक्षीस त्याला मिळणार आहे. रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामातील पाच फेऱ्या पूर्ण झाल्या असून आता टी-20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 23 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत मुंबईचा संघही सहभागी होणार असून कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात येणार असल्याच्या बातम्या येत आहेत. श्रेयसकडे कर्णधारपदाचा भरपूर अनुभव आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 मध्ये ट्रॉफीही जिंकली होती. पण काही दिवसाआधी अजिंक्य रहाणे कर्णधार असणार अशी बातमी आली होती. त्यामुळे खांदेपालट झाली की कर्णधारपदावरून अजिंक्य रहाणेची हकालपट्टी हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
इंडियन एक्स्प्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने रविवारी मुंबईचा संघ निवडण्यासाठी बैठक घेतली. त्यादरम्यान श्रेयस अय्यरला कर्णधार बनवण्याचा निर्णयही घेण्यात आला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कर्णधारपदासाठी श्रेयस हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे एमसीएच्या निवड समितीचे मत आहे.
अजिंक्य रहाणे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणार....
🚨 SHREYAS IYER - THE CAPTAIN IS BACK 🚨
— Johns. (@CricCrazyJohns) November 17, 2024
- Shreyas Iyer will lead Mumbai in the Syed Mushtaq Ali. [Devendra Pandey From Express Sports] pic.twitter.com/VDteq1Lf7Z
मुंबई संघात रणजी ट्रॉफीमध्ये कर्णधारपद भूषवणारा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेचाही समावेश असेल. मात्र, टी-20 स्पर्धेचा विचार करता त्याला कर्णधार बनवण्यात आलेले नाही. याच कारणामुळे तो आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. एमसीएच्या निवड समितीने रहाणेला अय्यरने छोट्या फॉरमॅटमध्ये मुंबई संघाचा कर्णधार बनवायचे आहे असे कळवले आहे. याशिवाय नुकतेच रणजी ट्रॉफीच्या मध्यभागी वगळलेल्या पृथ्वी शॉलाही स्थान देण्यात आले आहे. एका सूत्राने सांगितले की, सय्यद मुश्ताक अलीच्या जागी अय्यर मुंबई टी-20 संघाचे नेतृत्व करणार असून शॉचाही समावेश करण्यात आला आहे. रहाणे अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. कारण एमसीएला वाटते की अय्यर या फॉरमॅटसाठी योग्य पर्याय आहे.
शिवम दुबे, मुशीर खान आणि तुषार देशपांडे हे अष्टपैलू खेळाडू अद्याप आपापल्या दुखापतीतून पूर्णपणे बरे झालेले नाहीत आणि एमसीएने त्यांची निवड न करण्याचे हे मुख्य कारण आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबई आपल्या लीग सामन्यांमध्ये गोवा, महाराष्ट्र, केरळ, नागालँड, सर्व्हिसेस आणि आंध्र विरुद्ध खेळेल.
हे ही वाचा -