एक्स्प्लोर

रोहित-कोहलीची जोडी पुन्हा मैदानात दिसणार; श्रीलंकेविरुद्ध आज पहिला वनडे सामना, पाहा टीम इंडियाची संभाव्य Playing XI

IND vs SL 1st ODI India's Predicted Playing XI: श्रीलंकेविरुद्धच्या आजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

IND vs SL 1st ODI India's Predicted Playing XI: भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्या आजपासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. तीन सामन्यांची ही मालिका कोलंबो मैदानावर खेळण्यात येणार आहे. याआधी झालेल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेच्या 3-0 अशा फरकाने पराभूत केला होता.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीसह (Virat Kohli) अनेक वरिष्ठ खेळाडू पुन्हा एकदा एकत्र दिसतील. त्यामुळे एकदिवसीय संघात अनेक बदल पाहायला मिळेल.  त्यामुळे श्रीलंकेविरुद्धच्या आजच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

टीम इंडियाची टॉप ऑर्डर कशी असेल?

कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल सलामीला उतरतील. तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल. दरम्यान विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या जागेची अदलाबदल देखील होऊ शकते. म्हणजेच विराट कोहली रोहित शर्मासोबत सलामीला खेळतानाही दिसू शकतो. 

टीम इंडियाची मिडल ऑर्डर-

मधल्या फळीची सुरुवात श्रेयस अय्यरपासून होऊ शकते. यानंतर केएल राहुल पाचव्या क्रमांकावर दिसू शकतो. एकदिवसीय मालिकेत ऋषभ पंतच्या जागी केएल राहुलला प्राधान्य दिले जाऊ शकते. यानंतर रियान पराग सहाव्या क्रमांकावर दिसू शकतो. भारताकडून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा रियान पराग वनडेमध्येही पदार्पण करू शकतो. परागने टी-20 मालिकेत उत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी दाखवली, हे लक्षात घेऊन त्याला एकदिवसीय संघात स्थान मिळू शकते. त्यानंतर अष्टपैलू अक्षर पटेल सातव्या क्रमांकावर दिसू शकतो. याशिवाय गोलंदाजीत कुलदीप यादवकडे मुख्य फिरकी गोलंदाज म्हणून पाहिले जाऊ शकते. तर वेगवान गोलंदाजीत मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग आणि खलील अहमद मैदानात उतरतील.

श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वनडेत टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रायन पराग, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, खलील अहमद.

श्रीलंकेचा संपूर्ण संघ-

चारिथ असलांका (कर्णधार), पॅटम निसांका, अविश्का फर्नांडो, कुसल मेंडिस, सादिरा समराविक्रम, कामिंदु मेंडिस, झेनिथ लियानगे, मोहम्मद शिराज, वानिंदु हसेरंगा, डुनिथ व्हेलागे, महिरन्के एक फर्नांडो, इशान मलिंगा.

एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक-

2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)

4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)

7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)

संबंधित बातमी:

गौतम गंभीर-सूर्यकुमार यादवचे 4 चक्रवणारे निर्णय; श्रीलंकेच्या थिंक टँकने विचारही केला नव्हता!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget