एक्स्प्लोर

ICC ODI Rankings : विराट, शुभमनला धक्का! रोहित शर्मा अव्वल, श्रेयस अय्यरलाही फायदा; आयसीसी क्रमवारी जाहीर, पाहा संपूर्ण यादी!

आयसीसीच्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत (ICC ODI Rankings) भारतीय संघाच्या खेळाडूंमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहेत.

Rohit Sharma top ICC ODI Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय सलामीवीर रोहित शर्मा याने बुधवारी (29 ऑक्टोबर 2025) आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या नव्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. 38 वर्षीय रोहित शर्मा हा आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणाऱ्या सर्वात वयस्कर फलंदाजांपैकी एक ठरला आहे. आपल्या दीर्घ क्रिकेट कारकिर्दीत रोहितने पहिल्यांदाच ही कामगिरी साध्य केली आहे.

रोहितने आपल्या रेटिंगमध्ये तब्बल 36 गुणांची भर घालत 741 वरून 781 गुणांपर्यंत मजल मारली. यामुळे त्याने भारतीय संघसहकारी आणि सध्याचा कसोटी व वनडे कर्णधार शुभमन गिल याला मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला. यापूर्वी 2019 च्या विश्वचषकादरम्यान रोहित 882 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला होता. त्या वेळी त्याने विक्रमी पाच शतके झळकावली होती.

सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताच रोहितने पुन्हा एकदा आपल्या बॅटने वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने तीन डावांत 202 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचा फलंदाजीचा सरासरी तब्बल 101 इतका होता. या दमदार कामगिरीच्या जोरावर रोहित शर्मा आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला. सिडनीत झालेल्या तिसऱ्या वनडेत त्याने आपल्या कारकिर्दीतील 33वे एकदिवसीय आणि 50वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्याच्या त्या शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सनी पराभव केला.

शुभमन गिल अन् विराट कोहलीची घसरण

अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान दुसऱ्या स्थानी असून भारतीय कर्णधार शुभमन गिल पहिल्या स्थानावरून घसरून आता तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान, स्टार फलंदाज विराट कोहलीदेखील एका स्थानाने खाली येत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

श्रेयस अय्यरलाही फायदा

 दुसरीकडे, अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरने एक स्थानाची झेप घेतली असून तो आता नवव्या स्थानावर आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनीतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली आहे. झेल घेताना झालेल्या अपघातात अय्यरच्या बरगड्यांना मार लागला, ज्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव (Internal bleeding) सुरू झाला. तत्काळ त्याला रुग्णालयात नेण्यात आले असून, ICU मध्ये दाखल करण्यात आले. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले असून, सध्या अय्यरची तब्येत स्थिर आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

हे ही वाचा -

Rohit Sharma ICC ODI Rankings: वनडेचा राजा रोहित शर्मा...; ICC क्रमवारीत नंबर 1 स्थान पटकावले, आतापर्यंतचा सगळ्यात मोठा रेकॉर्ड, शुभमन गिलला टाकले मागे

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Santosh Banger Hingoli : बांगरांचा कारनामा, बातमीनंतर गुन्हा Special Report
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : चांदा ते बांदा; जिल्ह्यात कुठे कुठे राडा? Special Report
Maharashtra Local Body Election Result :निवडणुकांच्या निकालाचा नवा' कायदेशीर मुहूर्त' Special Report
Zero Hour Full : आधी निवडणुका, आता निकालही पुढे ढकललं, राजकीय आरोप-प्रत्यारोप
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
स्टेट बँक ऑफ इंडिया ते कॅनरा बँक, 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
Santosh Bangar : निवडणूक आयोगानं संतोष बांगर यांची आमदारकी रद्द करावी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखाची मागणी
निवडणूक आयोग जिवंत असेल तर आमदार संतोष बांगर यांच्यावर कारवाई करेल, ठाकरेंची शिवसेना आक्रमक
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2025 | मंगळवार
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, राज्यसभेत पेन्शनवर प्रश्न, केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण
Nashik Nagarparishad Election: नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
नाशिक जिल्ह्यात मतदानादरम्यान जोरदार राडा; मनमाडमध्ये भाजप, शिंदे गटाचे समर्थक भिडले, त्र्यंबकमध्ये पोलीस अन् उमेदवार प्रतिनिधींची बाचाबाची
Nilesh Rane: निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले,  'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
निवडणूक आयोगाला देखील कोर्टात खेचणार, अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर निलेश राणेंचा मोठा निर्णय; म्हणाले, 'ज्यांचा हातभार असेल त्यांच्यावर मी...'
Hardik Pandya :  हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
हार्दिक पांड्याकडून व्याजासह परतफेड, 7 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 77 धावा,  बडोद्याचा पंजाबवर दणदणीत विजय
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे आजचे दर जाणून घ्या
2025 मध्ये सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, चांदी 2 लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता, सोन्याचे दर जाणून घ्या
Embed widget