Rohit Sharma : टी-20 नंतर कसोटी क्रिकेटमधूनही रोहित शर्माचा 'The End'?; आकडेवारी पाहून चर्चांना उधाण
बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे खेळला जात आहे.
Rohit Sharma India vs Australia : बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गाबा येथे खेळला जात आहे. टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरने चाहत्यांची पुन्हा एकदा निराशा केली. 100 धावापूर्वीच अर्धी टीम इंडिया पॅव्हेलियनमध्ये परतली होती. गाबा कसोटीत कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला.
Pat Cummins is that fired up after getting Rohit Sharma!#AUSvIND | #OhWhatAFeeling | @Toyota_Aus pic.twitter.com/dZImJlva2I
— cricket.com.au (@cricketcomau) December 17, 2024
चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला रोहित चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, पण नंतर तीच जुनी चूक करत त्याने त्याची विकेट गमावली. ॲडलेड कसोटीत रोहित ज्याप्रकारे बाद झाला, तसंच काहीसं गाबामध्येही पाहायला मिळालं. यानंतर रोहितवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
The worrying part was Rohit Sharma never looked like surviving the spell from Pat Cummins. Worked over & knocked out, his gloves now left lying in front of the dugout #AusvInd pic.twitter.com/u1WKIjdMKd
— Bharat Sundaresan (@beastieboy07) December 17, 2024
रोहितचा फ्लॉप शो सुरूच
ॲडलेड कसोटीनंतर रोहित शर्माही गाबामध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला, पण रोहितला ना सलामीला चांगली फलंदाजी करता आली ना मधल्या फळीत. चौथ्या दिवशी रोहित अवघ्या 10 धावा करून बाद झाला. पुन्हा एकदा पॅट कमिन्सने रोहितची विकेट घेतली. आता यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आणि त्याला टी-20 नंतर कसोटीतून निवृत्ती घेण्याचा सल्लाही दिला.
या मालिकेत रोहित पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. पण रोहितला ॲडलेड ओव्हलवरील दुसऱ्या कसोटीत केवळ 3 आणि 6 धावा करता आल्या. आता तो 10 धावा करून बाद झाला. गेल्या 13 कसोटी डावांमध्ये रोहितला केवळ एकच अर्धशतक झळकावता आले आहे. त्याच्या धावा 6, 5, 23, 8, 2, 52, 0, 8, 18, 11, 3, 6, 10 आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 2024-25 च्या मोसमात पहिल्या डावात रोहितची सरासरी केवळ 8.85 होती.
Rohit Sharma falls cheaply again, leaving India in serious trouble.
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) December 17, 2024
Rohit Sharma’s last 13 innings:
6, 5, 23, 8, 2, 52, 0, 8, 18, 11, 3, 6, 10.
pic.twitter.com/M7CeO3LhSh
कमिन्सने चौथ्यांदा केली रोहितला शिकार
कमिन्सने चौथ्यांदा कसोटीत कर्णधार रोहित शर्माची विकेट घेतली. कसोटी सामन्यात सर्वाधिक वेळा विरोधी कर्णधाराला बाद करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत तो संयुक्त दुसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या रिची बेनॉड आणि इम्रान खान यांनी प्रत्येकी 5 वेळा ही कामगिरी केली आहे.
Ab to Retire ho jao Rohit Sharma 🙏🤬#INDvAUS #RohitSharma #viratkholi #AUSvIND #KLRahul𓃵 pic.twitter.com/aKeUSIMkAK
— Ajay Kaswan (@AjayKaswan32) December 17, 2024
रिची बेनॉडने इंग्लंडचा माजी कर्णधार टेड डेक्सटरला 5 वेळा बाद केले होते. तर पाकिस्तानच्या इम्रान खानने सुनील गावसकरला 5 वेळा पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. रिची बेनॉडने माजी भारतीय कर्णधार गुलाबराय रामचंदला 4 वेळा तर कपिल देवने वेस्ट इंडिजच्या क्लाईव्ह लॉईडला 4 वेळा आता पॅट कमिन्सने 4 वेळा रोहित शर्माला बाद केले आहे. हे संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
हे ही वाचा -
संघाला मोठा धक्का! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीदरम्यान खेळाडूने अचानक घेतली तडकाफडकी निवृत्ती, म्हणाला....