Horoscope Today 17 December 2024 : आजचा मंगळवार खास; सर्व 12 राशींसाठी कसा असणार दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 17 December 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...
Horoscope Today 17 December 2024 : पंचांगानुसार, आज 17 डिसेंबर 2024, मंगळवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 17 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 17 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष (Aries Horoscope Today)
नवीन प्रॉपर्टी घेण्यासंबंधी काही अडचणी उद्भवतील. तुमच्या अंगातील कला दाखवण्याची संधी मिळेल.
वृषभ (Taurus Horoscope Today)
आज कष्टाचे फारसे चीज होणार नाही. वैवाहिक जीवनात तारेवरची कसरत करावी लागेल.
मिथुन (Gemini Horoscope Today)
एखाद्या मनाविरुद्ध घडलेल्या घटनेसाठी काळच औषध आहे हे लक्षात ठेवावे लागेल.
कर्क (Cancer Horoscope Today)
करिअरबाबत उदासीन वाटेल, तरी आपले काम चोख बजावाल.
सिंह (Leo Horoscope Today)
आज शांतपणे काम कराल. वाहने जपून चालवा. व्यवसायात जे काम करत असाल त्यामध्ये एखादे वैगुण्य राहण्याची शक्यता आहे.
कन्या (Virgo Horoscope Today)
विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे येऊ शकतात. घरामध्ये काही व्यक्तींसाठी त्याग करावा लागेल.
तूळ (Libra Horoscope Today)
आर्थिक स्थिती बरी राहिली तरी ऐपत असूनही काही गोष्टी बाबत उदासीन रहाल.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी एरवीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतील.
धनु (Sagittarius Horoscope Today)
तुमच्या स्वभावामुळे आजूबाजूचे लोक गोंधळून जातील. मनाविरुद्ध घडलेल्या घटनांमुळे जास्त निराश व्हाल.
मकर (Capricorn Horoscope Today)
महिलांच्या अपेक्षा पुऱ्या होऊ शकणार नाहीत. कुटुंबातील लोकांना काय हवं नको ते बघाल.
कुंभ (Aquarius Horoscope Today)
प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. खांदेदुखी, गुडघेदुखी यासाठी औषधे घ्यावी लागतील.
मीन (Pisces Horoscope Today)
एखाद्या गोष्टीचा मानसिक त्रास किती करून घ्यायचा याचा विचार करा. विद्यार्थी संशोधन क्षेत्रात चमकतील.
डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)
संपर्क - 9823322117
हेही वाचा: