रोहित है तो मुमकिन है! हिटमॅनच्या शतकी तडाख्यात अनेक विक्रम ध्वस्त, विराटचाही विक्रम मोडीत
Rohit Sharma T20 International Records : भारताचा कर्णधार रोहित शर्माने बेंगलोरच्या मैदानात वादळी शतक ठोकले. रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधील पाचव्या शतकाला गवसणी घातली. असा पराक्रम करणारा रोहित शर्मा पहिल्याच खेळाडू ठरलाय.
Rohit Sharma T20 International Records : भारताचा कर्णधार रोहित शर्माने बेंगलोरच्या मैदानात वादळी शतक ठोकले. रोहित शर्माने टी 20 क्रिकेटमधील पाचव्या शतकाला गवसणी घातली. असा पराक्रम करणारा रोहित शर्मा पहिल्याच खेळाडू ठरलाय. रोहित शर्माने फक्त 69 चेंडूवर 121 धावांचा पाऊस पाडला. या शतकी खेळीमध्ये रोहित शर्माने 11 चौकार आणि आठ षटकार ठोकले. रोहित शर्माने आजच्या वादळी खेळीसह अनेक विक्रमांना गवसणी घातली. पाहूयात रोहितने एकाच तडाख्यात किती विक्रम केले.
टी20 क्रिकेटमध्ये पाच शतके -
टी 20 क्रिकेटमध्ये पाच शतक ठोकणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरलाय. रोहित शर्माने सूर्यकुमार यादव आणि ग्लेन मॅक्सवेल यांना मागे टाकलेय. सूर्या आणि मॅक्सवेल यांच्या नावावर टी20 क्रिकेटमध्ये प्रत्येकी चार चार शतकांची नोंद आहे. पाच शतके ठोकणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरलाय.
T20I मध्ये कर्णधार असताना सर्वाधिक षटकार -
रोहित शर्माने अफगाणिस्तानविरोधात शतकी खेळी केली. यामध्ये आठ गगनचुंबी षटकर ठोकले. यासह टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा कर्णधार म्हणून विक्रम केलाय.
एका सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारा कर्णधार -
टी20 सामन्यात सर्वाधिक षटकार ठोकणारा कर्णधार म्हणून रोहित शर्माच्या नावावर विक्रम झालाय. याआधी कोणत्याही कर्णधाराला एका सामन्यात आठ षटकार मारता आले नव्हते.
भारतासाठी सर्वोच्च धावसंख्या -
भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये एका डावात सर्वोच्च धावसंख्या नोंदवण्याचा विक्रमात रोहित शर्माची आजची खेळी तिसऱ्या क्रमांकावर आहे. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावसंख्या शुभमन गिलच्या नावावर आहे.
T20I मध्ये भारतासाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या
126* शुभमन गिल विरुद्ध न्यूझीलंड अहमदाबाद 2023
123* रुतुराज गायकवाड विरुद्ध औस गुवाहाटी 2023
122* विराट कोहली विरुद्ध अफगाणिस्तान दुबई 2022
121* रोहित शर्मा विरुद्ध अफगाणिस्तान बंगळूर 2024
टी20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठी भागिदारी -
रोहित शर्मा आणि रिंकू सिंह यांनी कठीण परिस्थिती भारताचा डाव सावरला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी नाबाद 190 धावांची भागिदारी केली. टी 20 क्रिकेटमध्ये भारताकडून ही सर्वात मोठी भागिदारी ठरली.
- 190* रोहित शर्मा - रिंकू सिंह विरुद्ध अफगाणिस्तान बंगळूर 2024
- 176 संजू सॅमसन - दीपक हुडा विरुद्ध आर्यलँड डब्लिन 2022
- 165 रोहित शर्मा - केएल राहुल विरुद्ध श्रीलंका इंदूर 2017
- 165 यशस्वी जैस्वाल - शुभमन गिल विरुद्ध वेस्ट इंडिज लॉडरहिल 2023
युवराजच्या विक्रमाची बरोबरी -
टी 20 क्रिकेटमध्ये एकाच षटकात सर्वाधिक धावांचा विक्रमही रोहित आणि रिंकू यांनी केलाय. रिंकू आणि रोहित यांनी 20 व्या षटकात 36 धावा लुटल्या होत्या. याआधी एकाच षटकात युवराजने 36 धावा काढल्या. युवराजच्या या विक्रमाची आज बरोबरी केली.
रोहित शर्माने किंग कोहलीचा विक्रम मोडला -
बेंगलोरमध्ये शतकी खेळी करत रोहित शर्माने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. त्याने माजी कर्णधार विराट कोहली याचाही विक्रम मोडीत काढला. रोहित शर्मा आता भारताकडून टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार झालाय. याआधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता. विराट कोहली आता दुसर्या क्रमांकावर घसरलाय. रोहित शर्माने टी 20 मध्ये कर्णधार असताना 1572 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने कर्णधार असताना टी20 क्रिकेमध्ये 1570 इतक्या धावा ठोकल्या होत्या. आज हा विक्रम मोडीत निघाला.
25 किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येवर चार बाद झाल्यानंतर सर्वोच्च धावसंख्या
212/4 भारत विरुद्ध अफगाणिस्तान बंगळूर 2024 (22/4 पासून)
188/6 यूएसए वि आयर लॉडरहिल 2021 (16/4 पासून)
174/10 फिलीपिन्स विरुद्ध कंबोडिया नोम पेन्ह 2023 (23/4 पासून)
आणखी वाचा :
रोहितच्या उताऱ्यानंतर रिंकू सिंहचा तडाखा; शेवटच्या षटकात 36 कुटल्या अन् युवराजची सुद्धा आठवण!
विराट ढेपाळला, रोहित एकटाच लढला, टी20 चं पाचवं शतक ठोकलं, अनेक विक्रम ध्वस्त