Rohit Sharma's 10-year-old Tweet Goes Viral: एकदिवसीय संघाचं कर्णधारपद मिळाल्यानंतर रोहितचं 10 वर्षापूर्वीचं ट्वीट व्हायरल
Rohit Sharma's 10-year-old Tweet Goes Viral: चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीनं रोहितच्या नावावर एकदिवसीय संघाचा कर्णधार आणि कसोटीचा उपकर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केलंय.
Rohit Sharma's 10-year-old Tweet Goes Viral: मुंबईकर रोहित शर्माकडे (Rohit Sharma) अखेर भारताच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आलंय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (SA Vs IND) होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी बुधवारी भारताच्या 18 खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीनं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करतानाच रोहितकडं एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलंय. यातंच एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर रोहितचं 10 वर्षापूर्वीचं जुनं ट्वीट प्रचंड व्हायरल होतंय.
भारताला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही कसोटी मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर जानेवारीत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. रोहित या मालिकेपासून 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारतीय संघाची कमान संभळणार आहे.
2011 च्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्माची संघात निवड झाली नव्हती. त्यावेळी त्यानं ट्विटरवर त्याची प्रतिक्रिया दिली होती. "विश्वचषकात भारतीय संघाचा भाग नसल्यानं मी खरोखरच निराश झालोय. हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का आहे", असं त्यानं म्हटलं होतं.
रोहित शर्माचं ट्वीट-
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारताची कामगिरी अत्यंत खराब होती. या स्पर्धेत भारताला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आलं होतं. त्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 ने पराभव केला. विराटनं यापूर्वीच भारतीय संघाच्या टी-20 संघाचं कर्णधारपद सोडलंय. आता त्याची एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आलीय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-