ICC Awards 2021: आयसीसीच्या कसोटी संघात तीन भारतीय खेळाडूंचा समावेश, विराटला स्थान नाही
ICC Men's Test team 2021 : मागील दोन वर्षांपासून विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आयसीसीच्या संघात विराट कोहलीला स्थान मिळाले नाही.
ICC Men's Test Team 2021 : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने (ICC) वर्ष 2021 च्या सर्वोत्कृष्ट कसोटी संघाची घोषणा केली आहे. आयसीसीने निवडलेल्या संघात तीन भारतीय खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि आर. आश्विन यांचा समावेश आहे. या संघात विराट कोहलीला स्थान मिळालेलं नाही. मागील दोन वर्षांपासून विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे आयसीसीच्या संघात विराट कोहलीला स्थान मिळाले नाही. (ICC Men's Test team 2021)
आयसीसीने कसोटी संघाची धुरा न्यूझीलंडच्या केन विल्यमसनच्या खांद्यावर सोपवली आहे. आयसीसीने निवडलेल्या संघामध्ये सर्वाधिक तीन तीन खेळाडू भारत आणि पाकिस्तान संघातील आहेत. आयसीसीने एकदिवसीय आणि टी२० संघामध्ये एकाही भारतीय संघाला स्थान दिले नाही. 2021 मध्ये भारतीय संघाने खूप कमी एकदिवसीय सामने खेळे होते. तर टी२० विश्वचषकात खराब कामगिरी झाली होती. त्यामुळेच आयसीसीने एकदिवसीय आणि टी२० संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान दिले नाही. पण कसोटी संघात तीन खेळाडूंना स्थान दिलेय. रोहित, अश्विन आणि पंत यांना कसोटी संघात स्थान देण्यात आलेय.
आयसीसीने निवडलेल्या संघामध्ये सर्वाधिक खेळाडू भारत आणि पाकिस्तान संघातील आहेत. भारत आणि पाकिस्तान संघाचे प्रत्येकी तीन तीन खेळाडू या संघात आहेत. 2021 मध्ये टेस्ट चँपियनशिप जिंकणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन या संघाचा कर्णधार आहे. त्याशिवाय कायल जेमीसनलाही संघात स्थान देण्यात आलेय. पाकिस्तानच्या हसन अली, फवाद आलम आणि शाहीन अफ्रिदी यांनीही संघात स्थान मिळवले आहे. त्याशिवाय ऑस्ट्रेलियाच्या मार्नस लाबुशेन, इंग्लंडच्या जो रूट आणि श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्ने यांनाही आयसीसीने आपल्या संघात स्थान दिलेय.
2021 मधील आयसीसीचा कसोटी संघ -
रोहित शर्मा, दिमुथ करुणारत्ने, मार्सन लाबुशेन, जो रुट, केन विल्यमसन (कर्णधार),ऋषभ पंत, फवाद आलम, आर. अश्विन, कायले जेमीसन, हसन अली, शाहीन आफ्रिदी
Here's your 2021 ICC Men's Test Team of the Year 📝
— ICC (@ICC) January 20, 2022
Are your favourite players a part of the XI? 🤔 pic.twitter.com/GrfiaNDkpx