(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Sharma : रोहित शर्माचा फ्लॉप शो, पाच सामन्यात फक्त चार धावा
IND Vs AFG : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने अफगाणिस्तानविरोधात एकहाती वर्चस्व मिळावलं. पण रोहित शर्माला फलंदाजीत अपयश आलेय.
IND Vs AFG : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने अफगाणिस्तानविरोधात एकहाती वर्चस्व मिळावलं. पण रोहित शर्माला फलंदाजीत अपयश आलेय. फक्त अफगाणिस्तानविरोधातच नव्ह तर त्याआधीही त्याला धावा जमवता आल्या नाहीत. त्यामुळे रोहित शर्माचं संघातील स्थान धोक्यात आलेय. आगामी टी 20 विश्वचषक पाहून रोहित शर्माने 14 महिन्यानंतर टी 20 च्या संघात कमबॅक केले. आगामी टी20 विश्वचषकात रोहित शर्माकडे नेतृत्व देण्याच्या विचारात बीसीसीआय असल्याचे म्हटले जातेय. पण रोहित शर्माचा फॉर्म पाहता संघातील स्थानही निश्चित करु शकतो का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. रोहित शर्माला मागील पाच सामन्यात फक्त चार धावा करता आल्या आहेत. अफगाणिस्तानसारख्या कमकुवत संघाविरोधात रोहित शर्माला खातेही उघडता आले नाही.
भारतात झालेल्या वनडे विश्वचषकात रोहित शर्मा शानदार फॉर्मात होता. त्याने प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारला. रोहितचा हा फॉर्म पाहून टी 20 मध्येही संधी मिळाली. पण रोहित शर्माला वनडे आणि टी20 मध्ये लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याचा फॉर्म टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. धावांचा पाठलाग करताना रोहित शर्मा सपशेल अपयशी ठरत असल्याचे आकड्यावरुन दिसतेय. मागील पाच सामन्यात रोहित शर्मा फ्लॉप गेलाय. चार सामन्यात तर त्याला खातेही उघडता आले नाही. रोहित शर्माला फक्त एका सामन्यात खाते उघडता आले. पण चार धावांचा पल्लाही पार करता आला नाही.
रोहित शर्माचा ग्राफ घसरतोय -
रोहित शर्माचं टी 20 करिअर खूप मोठं राहिलेय. 150 टी 20 सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू ठरलाय. रोहित शर्माने 150 टी 20 सामन्यातील 142 डावात 30.34 च्या सरासरीने आणि 139.1 च्या स्ट्राइक रेटने 3853 धावा चोपल्या आहेत. रोहित शर्माने चार शतकेही ठोकली आहे. त्याच्या नावावर 29 अर्धशतकाचा समावेश आहे. पण मागील काही सामन्यात रोहितला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्याचा ग्राफ घसरल्याचे दिसतेय.
रोहित शर्माला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत संधी देण्यात आली होती, जेणेकरून हार्दिक पांड्या न खेळल्यास त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. पण रोहित शर्मा फलंदाजीत अपयशी ठरला. पण त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केल्यास त्याला भारताच्या टी20 संघाचे कर्णधारपद मिळणार हे निश्चित आहे.
रोहित शर्माला मोठी खेळी करण्याची संधी -
तीन सामन्याच्या टी 20 मलिकेत भारताने निर्वादित वर्चस्व गाजवलं. भारताने पहिल्या दोन्ही सामन्यात अफगाण संघाचा पराभव केला. भारताकडून शिवब दुबे याने अष्टपैलू कामगिरी केली. तर गोलंदाजीत अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल यांनी प्रभावी मारा केला. कर्णधार रोहित शर्मा याला फलंदाजीत अपयश आले. दोन्ही सामन्यात तो शून्यावर बाद झालाय. अखेरच्या सामन्यात रोहित शर्माला मोठी खेळी करण्याची संधी असेल. आयपीएलपूर्वी भारताचा हा अखेरचा टी 20 सामना असेल.