World Cup 2023 : हिटमॅन करणार मोठा विक्रम, सचिन-सौरवचा रेकॉर्ड निशाण्यावर
Top 5 Batters With Most Six in World Cup : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला दिमाखात सुरुवात झाली आहे.
Top 5 Batters With Most Six in World Cup : भारतात होणाऱ्या विश्वचषकाला दिमाखात सुरुवात झाली आहे. भारताने आपल्या पहिल्याच सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माला मोठी कामगिरी करता आली नाही. रोहित शर्मा खातेही न उघडता तंबूत परतला. पण अफगाणिस्तानविरोधात रोहित शर्माला षटकारांचा विक्रम करण्याची संधी आहे. 11 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरोधात भारताचा सामना होणार आहे. दिल्लीच्या मैदानात धावांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सामन्यात रोहित शर्मा सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीच्या षटकारांचा विक्रम मोडण्याची शक्यता आहे. त्यासाठी रोहित शर्माला अवघ्या पाच षटकारांची गरज आहे.
विश्वचषकात भारताकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम सध्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तर त्यानंतर सौरव गांगुली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर रोहित शर्माचा क्रमांक लागतो. रोहित शर्माने अफगाणिस्तानविरोधात पाच षटकार मारतच सचिनचा विक्रम मोडीत निघणार आहे. कोणत्या पाच जणांनी भारतासाठी विश्वचषकात सर्वाधिक षटकार ठोकलेत पाहूयात...
5 . महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) :
2011 विश्वचषक फायनलमध्ये धोनीचा विजयी षटकार कुणीही विसरु शकत नाही. विश्वछचषकात भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजामध्ये एमएस धोनीचाही क्रमांक लागतो. या यादीज धोनी पाचव्या स्थानावर आहे. धोनीने भारतासाठी विश्वचषकाच्या 29 सामन्यात 15 षटकार मारले आहेत. त्याशिवाय धोनीने विश्वचषकात 780 धावा केल्या आहेत.
4. वीरेंद्र सहवाग (Virender Shewag) :
भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. सेहवाग पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी करतो, त्यामुळेच तो या यादीमध्ये आहे. सेहवागने भारतासाठी 22 सामन्यात 18 षटकार ठोकले आहेत.तर विश्वचषकात त्याने 843 धावा केल्या आहेत.
3. रोहित शर्मा (Rohit Sharma) :
चौकार-षटकारांची आतषबाजी करणाऱ्या रोहित शर्माला क्रिकेटमध्ये हिटमॅन म्हणून ओळखले जाते. रोहित शर्माने आयसीसीच्या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. रोहित शर्माने दोन विश्वचषकात भारतासाठी 17 सामने खेळले आहेत. रोहितने विश्वचषकात 23 षटकार मारले आहेत. 2023 विश्वचषकात फक्त 5 षटकार मारताच रोहित शर्मा भरातासाठी सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्माकडून मोठ्या कामगिरीची आपेक्षा आहे.
2. सौरव गांगुली (Sourav Ganguly) :
विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजात दुसऱ्या क्रमांकावर आहे. गांगुलीने विश्वचषकात 21 सामन्यात 25 षटकार ठोकले आहेत. विश्वचषकात 55.88 च्या सरासरीने 1006 धावा चोपल्या आहेत.
1. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) :
गॉर्ड ऑफ क्रिकेट म्हणून ख्याती असणाऱ्या सचिन तेंडुलकर या यादीत पहिल्या स्थानावर आहे. सचिन तेंडुलकरने 1992 ते 2011 यादरम्यान विश्वचषकात 45 सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने 27 षटकार ठोकले आहेत. सचिनचा हा विक्रम रोहित शर्मा यंदा मोडण्याची शक्यता आहे. रोहित शर्माला यासाठी फक्त पाच षटकारांची गरज आहे.