(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T20 World Cup 2022: ऑस्ट्रेलियाला पोहचताच टीम इंडियाची सरावाला सुरूवात; सोमवारी खेळणार पहिला सामना
T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झालाय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं तिथं पोहोचल्यानंतर वेळ न गमावता सरावासाठी मैदानात उतरला आहे.
T20 World Cup 2022: आगामी टी-20 विश्वचषक खेळण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला रवाना झालाय. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ तिथं पोहोचल्यानंतर वेळ न गमावता सरावासाठी मैदानात उतरला आहे. भारतीय संघ सध्या पर्थ येथे आहे, जिथे विश्वचषकाची तयारी केली जाणार आहे. पर्थला पोहोचल्यानंतर भारतीय संघानं शुक्रवारी सकाळी प्रतिष्ठित वाका स्टेडियमवर पहिल्या सराव सत्रात भाग घेतला. मायदेशात ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिका जिंकत भारतीय संघ ऑस्ट्रेलियासाठी रवाना झालाय. या स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
विश्वचषकात सहभागी होणारा भारतीय टी-20 संघ आणि सपोर्ट स्टाफ गुरुवारी मुंबईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं भारतीय खेळाडूंनी प्रतिष्ठित पर्थच्या मैदानावर सराव सुरू केल्याचे फोटो शेअर केले आहे.
ट्वीट-
Hello and welcome to WACA 🏟 #TeamIndia are here for their first training session. pic.twitter.com/U79rpi9u0d
— BCCI (@BCCI) October 7, 2022
भारताच्या सराव सामन्याचे वेळापत्रक
दरम्यान, विश्वचषक खेळणारे बहुतेक संगात द्विपक्षीय मालिका खेळत आहेत. आगामी टी-20 विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी भारत काही सराव सामने खेळणार आहे. भारत 10 ऑक्टोबर आणि 13 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया इलेव्हनशी भिडणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ब्रिसबेन येथे जातील, जिथे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्याशी अनुक्रमे 17 ऑक्टोबर आणि 19 ऑक्टोबरला दोन अधिकृत सराव सामने खेळतील.
ऑस्ट्रेलियाच्या या प्रमुख शहरात रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 मध्ये 16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण 46 सामने खेळले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांमध्ये म्हणजेच अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी येथे खेळले जाणार आहे. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
हे देखील वाचा-