World Cup 2019 | रोहित-राहुलने मोडला 23 वर्षापूर्वीचा सचिन-सिद्धूचा विक्रम
रोहितने शिखर धवनच्या अनुपस्थितीत केएल राहुलच्या सोबतीने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. धवनच्या जागी संधी मिळालेल्या राहुलनेही 57 धावा ठोकत रोहितला चांगली साथ दिली. दोघांनी 136 धावांची भागिदारी रचली.
![World Cup 2019 | रोहित-राहुलने मोडला 23 वर्षापूर्वीचा सचिन-सिद्धूचा विक्रम rohit sharma kl rahul become first opener from india who hit hundred against pakistan World Cup 2019 | रोहित-राहुलने मोडला 23 वर्षापूर्वीचा सचिन-सिद्धूचा विक्रम](https://wcstatic.abplive.in/mh/prod/wp-content/uploads/2019/06/Rohit-Rahul.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
लंडन : इंग्लंडमधील विश्वचषकात विराट कोहलीच्या टीम इंडियाचा सामना आज पाकिस्तानशी होत आहे. भारताने रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर सामन्यात धमाकेदार सुरुवात केली. रोहितने त्याच्या कारकिर्दितीतलं 24 वं शतक साजरं केलं, तर यंदाच्या विश्वचषकातील हे त्याचं दुसरं शतक ठरलं.
रोहितने शिखर धवनच्या अनुपस्थितीत केएल राहुलच्या सोबतीने भारताला चांगली सुरुवात करुन दिली. धवनच्या जागी संधी मिळालेल्या राहुलनेही 57 धावा ठोकत रोहितला चांगली साथ दिली. रोहित आणि राहुलने 136 धावांची भागिदारी केली आणि 23 वर्षापूर्वीचा सचिन तेंडुलकर आणि नवज्योत सिंग सिद्धूचा रेकॉर्डही मोडला.
विश्वचषकात भारताकडून सलामीच्या जोडीने पहिल्यांदा शतकी भागिदारी केली आहे. याआधी सचिन तेंडुलकर व नवज्योत सिद्धू यांनी 1996 च्या विश्वचषक स्पर्धेत 90 धावांची भागीदारी केली होती.
भारत आणि पाकिस्तान याआधी विश्वचषकात सहा वेळा आमने-सामने आले आहे. मात्र कोणत्याही सलामीच्या जोडीला शतकी भागीदारी करता आली नव्हती, ती कमाल आज रोहित शर्मा आणि केएल राहुलने केली केली.
पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात भारताच्या सलमीवीरांची कामगिरी
1992 - अजय जडेजा आणि के श्रीकांत, 25 धावा 1996 - नवज्योत सिंग सिद्धू आणि सचिन तेंडुलकर, 90 धावा 1999 - सचिन तेंडुलकर आणि सदगोपन रमेश, 37 धावा 2003 -वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर, 53 धावा 2011 - रोहित शर्मा आणि शिखर धवन, 34 धावा
2019 - रोहित शर्मा आणि केएल राहुल, 136 धावा
VIDEO | रोहित शर्माच्या शतकावर त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्यासह विश्लेषकांना काय वाटतं?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)