Rohit Sharma : मोठी बातमी : रोहित शर्माला डच्चू जवळपास निश्चित, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीतून बाहेर?
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा यानं सिडनी कसोटीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मेलर्बन कसोटीतील दारुण पराभव आणि सातत्याने फलंदाजीत अपयशी ठरणाऱ्या कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) सिडनी कसोटीतून (Sydney Test)वगळण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रशिक्षक गौतम गंभीरने आजच्या पत्रकार परिषदेत तसे संकेत दिले होते. त्यानंतर आता या बातमीवर शिक्कामोर्तब होत असल्याचे संकेत आहेत. रोहित शर्माऐवजी शुभमान गिलला संधी मिळण्याची चिन्हं आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना उद्या म्हणजेच 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.
कर्णधार कोण?
दरम्यान रोहित शर्माला डच्चू मिळाल्यास धुरा सिडनी कसोटीत भारतीय संघाची धुरा जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर असेल. बुमराहच्या नेतृत्त्वात भारताने याच मालिकेतील पहिल्या कसोटीत विजय मिळवला होता. आता पुन्हा एकदा भारतीय संघाचं नेतृत्व करुन बुमराह संघाला विजयपथावर आणतो का हे पाहावं लागेल. दरम्यान, या मालिकेत ऑस्ट्रेलिया 2-1 ने आघाडीवर आहे. मेलबर्न कसोटी रोहितची या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील शेवटची कसोटी ठरण्याची शक्यता आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत भारत पिछाडीवर
न्यूझीलंड विरुद्ध भारताच्या संघाला मयादेशात 3-0 नं पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवानंतर वैयक्तिक कारणामुळं रोहित शर्मानं पर्थ कसोटीतून माघार घेतली होती. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहनं टीम इंडियाचं पर्थ कसोटीत नेतृत्त्व केलं होतं. भारतानं त्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. मात्र, त्यानंतर अॅडलेड कसोटीत भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. ब्रिस्बेन कसोटीत पावसानं खेळ वाया गेल्यानं ती कसोटी अनिर्णीत राहिली होती. यानंतर मेलबर्न येथील कसोटीत भारताला मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला होता. अखेरच्या सत्रात भारतानं 7 विकेट गमावल्यानं पराभव स्वीकारावा लागला. यामुळं ऑस्ट्रेलिया 2-1 नं मालिकेत पुढं गेली आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी वाचवणार,गौतम गंभीरला विश्वास
भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर यानं भारत काही करुन बॉर्डर गावस्कर ट्रॉफी वाचवणार असल्याचं म्हटलं. भारताला ही ट्रॉफी वाचवायची असल्यास आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करायचा असल्यास कोणत्याही परिस्थितीत सिडनी कसोटीत विजय मिळवणं आवश्यक आहे.
दरम्यान, रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला संधी मिळाल्यास तो तिसऱ्या स्थानावर फलंदाजीला येईल. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल हे दोघे भारताच्या डावाची सुरुवात करतील अशी शक्यता आहे.
इतर बातम्या :