IND vs WI : सर्वाधिक शतकांच्या बाबतीत रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर, पहिल्या तीन क्रमांकावर कोण कोण?
Rohit Sharma Century : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरोधात दमदार शतक झळकावत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची सुरुवात दणक्यात झाली.
Rohit Sharma Century : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरोधात दमदार शतक झळकावत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची सुरुवात दणक्यात झाली. रोहित शर्माने कसोटीतील दहावे शतक झळकावले. रोहित शर्माचे हे 44 वे आंतरराष्ट्रीय शतक होते. या शतकासह रोहित शर्मा भारताकडून सर्वाधिक शतक झळकावणारा चौथा फलंदाज ठरलाय. या यादीत पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आणि तिसऱ्या क्रमांकावर राहुल द्रविड आहे.
वेस्ट इंडिजविरोधात रोहित शर्माने 103 धावांची खेळी केली. मागील 39 डावात रोहित शर्माचे हे सातवे शतक होय.. याशिवाय त्याने 4 अर्धशतकेही झळकावली आहेत. या शतकासह सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या सध्या खेळत असणाऱ्या फलंदाजात रोहित शर्माने स्टिव्ह स्मिथची बरोबरी गेली. या यादीत विराट कोहली पहिल्या क्रमाकंवर आहे.
वेस्ट इंडिजविरोधात शतक झळकावण्यात सचिनची बरोबरी
रोहित शर्माने वेस्ट इंडिजविरोधात सातवे शतक झळकावले. वेस्ट इंडिजविरोधात सर्वाधिक शतक झळकावण्याच्या बाबतीत रोहित शर्माने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली. या यादीत माजी खेळाडू सुनील गावसकर 13 शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. विराट कोहली 11 शतकासह दुसऱ्या स्थानावर आहे.
सलामी फलंदाज म्हणून तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्माने आतापर्यंत 39 शतके लगावली आहेत. सलामी फलंदाज म्हणून सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजात रोहित शऱ्मा सहाव्या क्रमांकावर पोहचलाय. 45 शतकांसह सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर आहे. डेविड वॉर्नरच्या नावावरही 45 शतकांची नोंद आहे. ख्रिस गेल 42, सनथ जयसूर्या 41 आणि मॅथ्यू हेडन 40 शतकांची नोंद आहे.
रोहित शर्माच्या नावावर विक्रम -
रोहित शर्माने कसोटीत मोठा विक्रम नावावर केला आहे. कसोटीमध्ये सलामीला रोहित शर्माने 39 डावात सात शतके आणि चार अर्धशतके झळकावण्याचा विक्रम केलाय. त्याशिवाय कसोटीमध्ये रोहित शर्माने 3500 धावांचा पल्ला पार केला आहे. रोहित शर्माने 46 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडलाय. 2019 मध्ये रोहित शर्मा कसोटीत सलामीला उतरला अन् तेव्हापासून त्याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. सलामीला फलंदाजी करताना 50 पेक्षा जास्त धावा काढण्यात रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे.
विरेंद्र सेहवागला विराट कोहलीने टाकलं मागे
माजी कर्णधार विराट कोहलीने 8500 धावांचा पल्ला पार केला आहे. कसोटीमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजामध्ये विराट कोहली पाचव्या स्थानावर पोहचला आहे. विराट कोहलीने 110 व्या सामन्यात 8500 धावांचा पल्ला पार केला आहे. या कामगिरीत विराट कोहलीने विरेंद्र सेहवागला मागे टाकलं आहे. विराट कोहलीच्या पुढे आता लक्ष्मण, गावस्कर, द्रविड आणि सचिन तेंडुलकर हे फलंदाज आहेत.