IND vs SL: श्रीलंकेचा नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय; टीम इंडियात केएल राहुल, श्रेयस अय्यरचं पुनरागमन
IND vs SL 1st ODI: एकदिवसीय संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचं पुनरागमन झालं आहे.
IND vs SL 1st ODI: श्रीलंकेने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. एकदिवसीय संघात केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचं पुनरागमन झालं आहे. भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात आजपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु होत आहे. ही मालिका कोलंबो मैदानावर खेळण्यात येणार आहे. याआधी झालेल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेच्या 3-0 अशा फरकाने पराभूत केला होता.
🚨 Toss and Team Update 🚨
— BCCI (@BCCI) August 2, 2024
Sri Lanka win the toss and elect to bat in the 1st ODI.
A look at #TeamIndia's Playing XI 👌👌
Follow the Match ▶️ https://t.co/4fYsNEzO5N#SLvIND pic.twitter.com/NVJ4spwt0K
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज
श्रीलंकेची प्लेइंग इलेव्हन-
पथुन निशांका, अविश्का फर्नांडो, कुशल मेंडिस (यष्टीरक्षक), सादिरा समराविक्रम, चारिथ असलांका (कर्णधार), झेनिथ लियानगे, वानिंदु हसरंगा, डुनिथ वेलागे, अकिला धनंजया, असिश्था फर्नांडो, मोहम्मद शिराज
श्रीलंकेविरुद्ध विराट कोहलीचा रेकॉर्ड चांगला-
श्रीलंकेविरुद्ध विराट कोहलीचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. त्याने कोलंबोमध्ये 10 डावात 644 धावा केल्या आहेत. या कालावधीत चार शतके झळकावली आहेत. कोहलीची सरासरी 107.33 आहे. दुसरीकडे, मोहम्मद सिराज सदिरा समरविक्रमासाठी घातक ठरू शकतो. सिराजसमोर एकदिवसीय सामन्यांमध्ये तो दोनदा बाद झाला आहे.
श्रीलंकेला मोठा धक्का-
भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाईल. याआधीच श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. संघाचे दोन दिग्गज खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. मथिशा पाथिराना आणि दिलशान मदुशंका हे भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकणार नाहीत. श्रीलंकेने या दोघांच्या जागी मोहम्मद शिराज आणि इशान मलिंगाला संघात स्थान दिले आहे. यासोबतच संघाने आणखी तीन खेळाडूंना स्टँडबाय म्हणून ठेवले आहे.
एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक-
2 ऑगस्ट – पहिली वनडे (कोलंबो)
4 ऑगस्ट – दुसरी वनडे (कोलंबो)
7 ऑगस्ट – तिसरी एकदिवसीय (कोलंबो)
संबंधित बातमी:
गौतम गंभीर-सूर्यकुमार यादवचे 4 चक्रवणारे निर्णय; श्रीलंकेच्या थिंक टँकने विचारही केला नव्हता!