IND vs BAN : आशिया चषकात रोहित शर्माच्या नावावर लाजीरवाणा विक्रम
IND vs BAN, Rohit Sharma Record : आशिया चषकातील सुपर ४ फेरीतील अखेरचा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत सुरु आहे.
IND vs BAN, Rohit Sharma Record : आशिया चषकातील सुपर ४ फेरीतील अखेरचा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत सुरु आहे. बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना २६६ धावसंख्या केली. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात तंबूत परतला. रोहित शर्माला खातेही उघडता आले नाही. रोहित शर्मा याला तंजीम हसन साकिब याने तंबूत धाडले. रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम झालाय. आशिया कप इतिहासात रोहित शर्मा तिसऱ्यांदा शुन्यावर बाद झालाय.
रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम झालाय..
आशिया कप इतिहासात रोहित शर्मा तीन वेळा शून्यावर बाद झालाय. याशिवाय रोहित शर्मा आशिया कपच्या इतिहासात दोनदा शून्यावर बाद होणारा पहिला भारतीय सलामीवीर ठरला आहे. तसेच रोहित शर्माच्या नावावर आणखी एक लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला आहे. रोहित शर्मा आशिया कपच्या इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला भारतीय कर्णधार आहे. यापूर्वी आशिया कप 1988 मध्ये दिलीप वेंगसकर कर्णधार असताना शून्यावर बाद झाला आहे.
जड्डूचा मोठा विक्रम -
आशिया चषकात बांगलादेशविरोधात गोलंदाजी करतान शमीम हुसैन याला बाद करत रविंद्र जाडेजा याने वनडे क्रिकेटमध्ये दोनशे विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. रविंद्र जाडेजा २०० विकेट घेणारा पहिला भारतीय डावखुरा फिरकी गोलंदाज झालाय. भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा फिरकी गोलंदाजीचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. अनिल कुंबळेच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 334 विकेट आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या हरभजन सिंह याच्या नावावर 265 विकेट आहेत. रविंद्र जाडेजा आता तिसऱ्या क्रमांकावर पोहचलाय.
बांगलादेशची २६५ धावसंख्येपर्यंत मजल
शाकीब अल हसन आणि तौहीद ह्रदय यांच्या जिगरबाज फलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने २६५ धावसंख्येपर्यंत मजल मारली. खराब सुरुवातीनंतरही बांगलादेश संघाने निर्धारित ५० षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात २६५ धावांपर्यंत मजल मारली. शाकीब अल हसन याने ८० तर तौहीद ह्रदय याने ५४ धावांची खेळी केली. भारताकडून शार्दूल ठाकूर याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. भारतीय संघाला विजयासाठी २६६ धावांचे आव्हान आहे. गोलंदाजी शार्दूल ठाकूर सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. शार्दूल ठाकूर याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तर मोहम्मद शामी याने दोन फलंदाजांना तंबूत धाडले. पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णा याला एक विकेट मिळाली. अक्षर पटेल आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.