Rohit Sharma And Virat Kohli In ODI World Cup 2025: तुम्ही 2027 चा वर्ल्डकप खेळणार की नाही?; आगरकरांचा फोन; रोहित शर्मा अन् विराट कोहली म्हणाले...
Rohit Sharma And Virat Kohli In ODI World Cup 2025: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्माच्या जागी आता शुभमन गिलला भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Rohit Sharma And Virat Kohli In ODI World Cup 2025: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या एकदिवसीय आणि टी-20 संघांची (Ind vs Aus) घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र रोहित शर्माच्या जागी आता शुभमन गिलला भारताच्या एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. रोहित शर्माला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर विविध चर्चांना उधाण आले आहे. तसेच काही दिवसांआधी मला 2027 मधील वनडे विश्वचषक नक्कीच खेळायचा आहे, असं रोहित शर्मा म्हणाला होता. मात्र आता त्याला कर्णधारपदावरुन काढून टाकल्यानंतर रोहित शर्मा अन् विराट कोहली 2027 मधील वनडे विश्वचषक खेळणार की नाही?, असा प्रश्न उपस्थित होतोय.
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शुभमन गिलला (Shubhman Gill) भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले होते. आता, रोहित एकदिवसीय संघात सतत उपस्थित असूनही, शुभमन गिलकडे एकदिवसीय संघाचे नेतृत्वही सोपवण्यात आले आहे. त्यामुळे 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या सहभागाबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. यादरम्यान मुख्य निवडकर्ता अजित आगरकर (Ajit Agarkar) यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली.
रोहित आणि विराट एकदिवसीय विश्वचषकात खेळतील का? (Rohit And Virat ODI World Cup 2025)
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा झाल्यानंतर, निवडकर्ता आणि माजी क्रिकेटपटू अजित आगरकर यांना 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या सहभागाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाच्या उत्तरात अजित आगरकर म्हणाले की, रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही सध्या यावर भाष्य करू इच्छित नाहीत.
विराट आणि रोहितची निवृत्ती- (Rohit Sharma Virat Kohli)
2024 च्या टी२० विश्वचषकातील भारताच्या विजयानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर, रोहित शर्माने 7 मे रोजी टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पाच दिवसांनंतर, 12 मे रोजी विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. तथापि, अद्याप रोहित शर्मा किंवा विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली नाही.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India ODI Squad vs Australia)
शुभमन गिल- कर्णधार, श्रेयस अय्यर- उपकर्णधार, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेसाठीचा भारतीय संघ- (Team India T20 Squad vs Australia)
सूर्यकुमार यादव- कर्णधार, अभिषेक शर्मा, शुभमन गिल- उपकर्णधार, तिलक वर्मा,नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीकरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.



















