IND vs BAN Video : "बांगलादेशचा कर्णधार कोण, शांतो की ऋषभ पंत?" फिल्डिंग सेट करण्यामागचे खरं कारण आले समोर
India vs Bangladesh 1st Test : ऋषभ पंत त्याच्या जबरदस्त कमबॅकमुळे चर्चेत आहे.
Rishabh Pant why set Bangladesh field : चेन्नई कसोटीत भारतीय संघाने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला आहे. यासह यजमानांनी दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 0-1 अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यादरम्यान ऋषभ पंत त्याच्या जबरदस्त कमबॅकमुळे चर्चेत आहे. यासोबतच पंत भारताच्या दुसऱ्या डावात बांगलादेश संघाचे फिल्डिंग सेट करताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत होता. त्याचवेळी, सामना संपल्यानंतर पंतने विरोधी संघाची फिल्डिंग का सेट करत होता, याचे कारण सांगितले आहे.
Always in the captain’s ear, even when it’s the opposition’s! 😂👂
— JioCinema (@JioCinema) September 21, 2024
Never change, Rishabh Pant! 🫶🏻#INDvBAN #IDFCFirstBankTestSeries #JioCinemaSports pic.twitter.com/PgEr1DyhmE
ऋषभ पंतने बांगलादेशची फिल्डिंग सेट करण्याचे सांगितले कारण
खरं तर, मॅचनंतर मुलाखतीदरम्यान सबा करीमने पंतला विचारलं, 'जेव्हा तस्किन अहमद दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंग करायला येत होता, तेव्हा तू त्याच्यासाठी मैदान का फिल्डिंग लावत होता? बांगलादेशचा कर्णधार कोण, शांतो की ऋषभ पंत? त्यानेही तुझे म्हणणे ऐकले, असे का? यावर पंत म्हणाला की, मी जेव्हाही अजय जडेजाशी मैदानावर किंवा मैदानाबाहेर बोलतो तेव्हा तो फक्त एवढेच म्हणतो की, तुम्ही कुठेही खेळलात तरीही क्रिकेट चांगले झाले पाहिजे. तिथे एकही क्षेत्ररक्षक नव्हता, एका जागी दोन क्षेत्ररक्षक उभे होते. त्यामुळे मी म्हणालो, इथे क्षेत्ररक्षक लावा. ऋषभ पंतचे हे उत्तर ऐकून सबा करीमला हसू आवरता आले नाही.
Pant on viral moment pic.twitter.com/orWa1Si7vU
— PantMP4. (@indianspirit070) September 22, 2024
ऋषभ पंतने 634 दिवसांनी कसोटी सामना खेळताना ठोकले शतक
डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार अपघातामुळे ऋषभ पंत बराच काळ क्रिकेट ॲक्शनपासून दूर होता. चेन्नईमध्ये झालेल्या या सामन्यासह पंतने तब्बल 634 दिवसांनी कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्याची कामगिरी पाहता तो इतक्या दिवसांनी कसोटी सामना खेळायला, असे वाटले नाही. भारताच्या पहिल्या डावात पंतने 39 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात पंतने 109 धावांची शतकी खेळी केली. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे सहावे शतक होते. आता पंत यष्टिरक्षक फलंदाज म्हणून भारतासाठी कसोटीत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत एमएस धोनीसह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
हे ही वाचा -