Rishabh Pant: ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सला रामराम ठोकणार?; स्वत: पोस्ट करत केले जाहीर, क्रिकेटविश्वात खळबळ
Rishabh Pant IPL 2025: ऋषभ पंतच्या पोस्टनंतर आयपीएलच्या लिलावाआधी एकच चर्चा रंगली आहे.
Rishabh Pant IPL 2025: आयपीएल 2025 च्या स्पर्धेची (IPL 2025) उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. लवकरच मेगा लिलाव आयोजित करण्यात येणार आहे. त्याआधी बीसीसीआयने (BCCI) एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीनंतर कोणते खेळाडू कोणत्या संघात जाणार?, फ्रँचायझी कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवणार?, याबाबत चर्चा रंगल्या असताना दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याने केलेल्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
ऋषभ पंतने (Rishabh Pant) एक्स (आधीचे ट्विटर)वर पोस्ट करत चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. यामध्ये आयपीएलच्या लिलावत भाग घेतला, मी विकला जाईल की नाही, आणि मला कोणत्या संघाने विकत घेतल्यास किती रुपये मिळतील?, असा सवाल ऋषभ पंतने विचारला. ऋषभ पंतच्या या पोस्टनंतर तो दिल्ली कॅपिटल्स संघाची साथ सोडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे.
If go to the auction. will I be sold or not and for how much ??
— Rishabh Pant (@RishabhPant17) October 11, 2024
चाहत्यांकडून कमेंटचा पाऊस-
ऋषभ पंतच्या या पोस्टनंतर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. एका यूजर्सने लिहिले की, "20 कोटींहून अधिक रक्कम मिळेल." दुसऱ्या युजर्सने म्हटलं की, "तुम्ही अमूल्य आहात. तुम्ही एक महापुरुष आहात.
ऋषभ पंतची आतापर्यंतची आयपीएल कारकीर्द-
ऋषभ पंतने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 111 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 110 डावात फलंदाजी करताना त्याने 35.31 च्या सरासरीने आणि 148.93 च्या स्ट्राईक रेटने 3284 धावा केल्या आहेत. या कालावधीत ऋषभ पंतने 1 शतक आणि 18 अर्धशतके झळकावली आहेत. ऋषभ पंतने 2016 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. तो आतापर्यंत या स्पर्धेत फक्त दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे. अशा परिस्थितीत ऋषभ पंत दिल्ली सोडतात की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पाच खेळाडूंना कायम ठेवू शकणार-
आयपीएलमधील फ्रँचायझी पाच खेळाडूंना कायम ठेवू शकणार आहे. परंतु त्यानंतर लिलावासाठी तुमच्याकडे फक्त 45 कोटी रुपये शिल्लक राहतील, ज्यामुळे त्यांना उर्वरित 20 खेळाडू खरेदी करावे लागतील. अनकॅप्ड खेळाडूला 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवता येईल. अनकॅप्ड खेळाडू कोणत्याही देशाचा असू शकतो. एखाद्या संघाने 5 खेळाडूंना कायम केले, तर त्यांना तब्बल 75 कोटी रुपये मोजावे लागणार आहे.