खास मैत्रिणीमुळे ओळख; क्रिकेटमुळे जुळून आलं; रिंकू सिंह-प्रिया सरोज एकमेकांच्या संपर्कात कसे आले?
Rinku Singh And Priya Saroj : रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचे लवकरच लग्न होणार असल्याचे म्हटले जात आहे. ते एकमेकांच्या संपर्कात कसे आले, असे विचारले जात आहे.
Rinku Singh And Priya Saroj Marriage : भारताचा स्टार क्रिकेटपटू रिंकू सिंह लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्याच्या लग्नासाठी वधू पक्षाशी बातचित चालू असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे रिंकू सिंहसाठी त्याच्या घरच्यांनी जी मुलगी पसंद केली आहे, ती दुसरी तिसरी कोणी नसून खासदार प्रिया सरोज आहेत. सूर जुळून आलेच तर रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचे लग्न होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचा खरंच साखरपुडा झालाय?
गेल्या काही दिवसांपासून रिंकु सिंह आणि प्रिया सरोज यांचा साखरपुडा झाल्याचं बोललं जात होतं. माध्यमांत तसे वृत्तही आले होते. मात्र अद्याप या दोघांचा साखरपुडा झाला नसल्याची माहिती खुद्द प्रिया सरोज यांच्या वडिलांनीच दिली आहे. मात्र या दोघांच्या लग्नासंबंधी दोन्ही परिवारांत चर्चा चालू असल्याचेही प्रिया सरोज यांचे वडील आमदार तुफानी सरोज यांनी सांगितले आहे.
लग्नाची दोन्ही कुटुंबांत चर्चा, लवकरच तारीख ठरवणार
तुफानी सरोज यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या लग्नाबाबत रिंकू सिंहच्या वडिलांशी अलीगडमध्ये चर्चा झाली आहे. लवकरच त्यांचा साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरवण्यात येणार आहे.
View this post on Instagram
दोघांचे सूर कसे जुळले, ओळख कशी झाली?
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्या कुटुंबीयांत लग्नाबाबत चर्चा चालू आहे. विशेष म्हणजे हे दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखतात. प्रिया सरोज यांची एक मैत्रीण आहे. या मैत्रिणीचे वडील क्रिकेटर आहेत. त्यांच्याच माध्यमातून रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांची ओळख झाली होती. हे दोघेही एकमेकांना आधीपासूनच ओळखतात. दोन्ही कुटुंबांच्या सहमतीनेच हे लग्न झाले पाहिजे, असे रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांचे मत होते. आता त्यांच्या दोन्ही कुटुंबांत त्यांच्या लग्नाबाबत सकारात्मक चर्चा होत असून लवकरच त्यांच्या लग्नाची आणि साखरपुड्याची तारीख ठरवण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा :
ऑस्ट्रेलियात शतक ठोकलं, तिरुपतीला लोटांगण घातलं, मात्र नितीश कुमार रेड्डीला टीम इंडियात स्थान नाहीच!