(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rinku Singh: 6 षटकार, 4 चौकार, रिंकू सिंहने 33 चेंडूत ठोकल्या 77 धावा, पाहा VIDEO
Syed Mushtaq Ali Trophy : रिंकू सिंह याने 33 चेंडूत तब्बल 77 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये सहा षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे.
Rinku Singh, Syed Mushtaq Ali Trophy : विश्वचषकाच्या रनधुमाळीमध्येच (World Cup 2023) भारतामध्ये देशांतर्गत क्रिकेटचा थरारही सुरु आहे. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत (Syed Mushtaq Ali Trophy ) आज क्वार्टरफायनलची लढत सुरु आहे. मोहालीच्या मैदानावर उत्तर प्रदेश आणि पंजाब यांच्यात लढत झाली. यामध्ये पंजाब संघाने सहज बाजी मारली. पंजाबकडून नेहाल वढेरा याने अर्धशतक ठोकले. पण सर्वाधिक चर्चा रिंकू सिंहच्या (Rinku Singh) वादळी फलंदाजीची सुरु आहे. रिंकू सिंह याने 33 चेंडूत तब्बल 77 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये सहा षटकार आणि चार चौकारांचा समावेश आहे.
रिंकू सिंह याने अखेरच्या दोन षटकांत धावांचा पाऊस पाडला. 18 व्या षटकात 21 चेंडूत 38 धावांवर खेळत होता. पण 20 षटके झाली तेव्हा रिंकू 33 चेंडूत 77 धावांवर नाबाद होता. अखेरच्या दोन षटकात रिंकून पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. रिंकूने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. रिंकूच्या वादळी फलंदाजीचे व्हिडओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. रिंकू आयपीएल 2023 मध्ये प्रसिद्धीझोतात आला होता. रिंकू कोलकात्याकडून खेळतो. रिंकून गुजरातच्या यश दयाल याला लागोपाठ पाच षटकार ठोकले होते. कोलकात्याला विजयासाठी 5 चेंडू 29 धावांच गरज होती, तेव्हा रिंकून सलग सहा षटकार मारले होते. त्यानंतर रिंकूचे नाव देशभरात झाले होते. आयपीएलच्या दमदार कामगिरीनंतर रिंकूला टीम इंडियातही स्थान मिळाले. आशियाई क्रिडा स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी केली.
Rinku Singh masterclass in Syed Mushtaq Ali Trophy:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 2, 2023
77 in just 33 balls with 4 fours and 6 sixes for Uttar Pradesh. He's in phenomenal touch, the finisher Rinku...!!!pic.twitter.com/78nEKiUGuO
RINKU SINGH SHOW IN QUARTER-FINAL IN SMAT....!!!!
— Johns. (@CricCrazyJohns) November 2, 2023
He was 38*(21) at the end of 18th over then 6, 6, 2, 2, 0, 1, 6, 2, 6, 0, 6, 2 and ended in 77*(33) against Arshdeep led Punjab bowling unit. pic.twitter.com/sLwHJXcGRU
मोहालीच्या मैदानात पंजाबविरोधात उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात तीन विकेट्सच्या मोबदल्यात 169 धावा केल्या. पण 11.1 षटकात उत्तर प्रदेशने तीन विकेट्सच्या मोबद्लयात फक्त 53 धावा केल्या होत्या. त्यानंतर रिंकू फलंदाजीला आला आणि चित्र बदलले. रिंकूने समवीरच्या साथीने संघाची धावसंख्या वाढवली. रिंकून सहा षटकार आणि चार चौकाराच्या मदतीने 77 धाा जोडल्या. समवीर यानेही चार षटकाराच्या मदतीने 42 धावा केल्या. उत्तरप्रदेशने दिलेले हे आव्हान पंजाबने अखेरच्या षटकार पर केले. पंजाबने पाच विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान पार केले. पंजाबकडून नेहाल वढेरा याने अर्घधशतक ठोकले.
RINKU SINGH, THE FINISHER...!!!
— Johns. (@CricCrazyJohns) November 2, 2023
- The consistency has been unreal and taking the game into next level.pic.twitter.com/K1QqtnpQCh