Ricky Ponting Health Updates: पाँटिंगच्या तब्येतीबाबत महत्वाची माहिती; छातीत दुखू लागल्यानं रुग्णालयात धाव
Ricky Ponting Health Updates: ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (AUS vs WI) यांच्यात पर्थ येथे पहिला कसोटी सामना खेळला जातोय.
Ricky Ponting Health Updates: ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (AUS vs WI) यांच्यात पर्थ येथे पहिला कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात समालोचकाची भूमिका बजावत असलेल्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंगची Ricky Ponting अचनाक तब्येत बिघडल्यानं त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर पर्थ (Perth) मैदानावर काही क्षणाकरीता शांतता पसरली. यातच रिकी पाँटिंगच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर आलीय.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी रिकी पाँटिंगची तपासणी केल्यानंतर त्याची तब्येत ठीक असल्याचं सांगितलं. स्वत:च्या तब्येतीबाबत सांगताना रिकी पाँटिंग म्हणाला की, 'मी जस्टिन लँगरला माझ्या छातीत दुखण्याबद्दल सांगितलं होतं, जो त्यावेळी माझ्यासोबत कॉमेंट्री करत होता. पुढच्या 10-15 मिनिटांनंतर मी हॉस्पिटलमध्ये होतो, जिथे मला माझ्या मते सर्वोत्तम उपचार मिळाले.
ट्वीट-
"I mentioned to JL who was commentating with me that I'd had these pains in my chest ... 10 or 15 minutes later I was in the hospital getting the best treatment I possibly could."
— 7Cricket (@7Cricket) December 3, 2022
- @RickyPonting talks about his last 24 hours pic.twitter.com/GnW8OADghg
ट्वीट-
Former Australia skipper Ricky Ponting taken to hospital after heart scare while commentating during day three of Australia's first test against West Indies at Perth Stadium, reports Reuters.
— ANI (@ANI) December 2, 2022
(Photo source: Ponting's Twitter handle) pic.twitter.com/EyKFEzrLsl
लाबुशेन आणि स्मिथची द्वशतकी खेळी
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लॅबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांनी द्विशतकं झळकावली. मार्नस लबुशेननं 204 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 20 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. तर, स्टीव्ह स्मिथ 200 धावांवर नाबाद राहिला. त्याच्या खेळीत एकूण 16 चौकारांचा समावेश आहे. दोन्ही फलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसले. याशिवाय ट्रॅव्हिस हेडनं 99 आणि उस्मान ख्वाजानं 65 धावांचं योगदान दिलं.काढली. त्याशिवाय ट्रेविस हेड याने 99 आणि उस्मान ख्वाजा याने 65 धावांची खेळी केली.
हे देखील वाचा-