
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दक्षिण आफ्रिकेचा धावांचा यशस्वी पाठलाग ते हार्दिक पांड्याचे 100 षटकार, पहिल्या सामन्यातील विक्रम
IND vs SA : डेविड मिलर आणि रॅसी वॅन डर डुसेन यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सात गड्यांनी पराभव केला.

IND vs SA : डेविड मिलर आणि रॅसी वॅन डर डुसेन यांच्या वादळी अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं भारताचा सात गड्यांनी पराभव केला. भारताने दिलेले 212 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकाने सात गडी आणि पाच चेंडू राखून पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून डेविड मिलर आणि डुसेन यांनी मॅच विनिंग खेळी केली. ईशान किशनची 76 धावांची खेळी व्यर्थ केली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेनं पाच सामन्याच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. पहिल्या टी 20 सामन्यात अनेक विक्रम झाले.. या विक्रमावर एक नजर मारुयात...
भारत-दक्षिण अफ्रिका यांच्यातील टी20 सामन्यात झालेले विक्रम -
1. दक्षिण अफ्रिकाने आतंरराष्ट्रीय टी20 सामन्यात सर्वाधिक मोठ्या लक्षाचा यशस्वी पाठलाग केलाय. याआधी 2007 मध्ये वेस्ट विडिंजविरोधात दक्षिण आफ्रिकाने 206 धावांचा यशस्वी पाठलाग केलाय.
2. भारताविरोधात सर्वाधिक मोठ्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग... याआधी 200 पेक्षा जास्त धावा वाचवताना भारताचा एकदाही पराभव झाला नव्हता. याआधी दक्षिण अफ्रिकानेचं भारताविरोधात 2015 मध्ये 200 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.
3. श्रेयस अय्यरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन वेळा आऊट होण्याच्यामध्ये 240 धावा केल्यात. यामध्ये श्रेयस अय्यरने ऑस्ट्रेलियाच्या फिंचच्या विक्रमाची बरोबरी केली.
4. ट्रिस्टन स्टब्स दक्षिण आफ्रिकाविरोधात टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा 95 वा खेळाडू ठरला
5. हार्दिक पांड्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकारांचा विक्रम पूर्ण केलाय.
6. रासी वान डेर डुसन याने टी20 क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या.
7. रासी वान डर डुसन आणि डेविड मिलर यांच्यामध्ये नाबाद 131 धावांची भागिदारी केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकासाठी मोठी भागिदारी होय.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
