IPL 2026 News : शिक्कामोर्तब! संजू सॅमसन आता पिवळ्या जर्सीत; 'थलपति' जडेजाला CSK चा गुडबाय, कमी पैशात राजस्थानने विकत घेतलं, किती कोटी रुपयांमध्ये झाली डील?
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2026पूर्वी मोठा धमाका करत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला आपल्या संघात सामील करून घेतले.

Ravindra Jadeja Sam Curran traded to RR Sanju Samson joins CSK : चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2026पूर्वी मोठा धमाका करत राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनला आपल्या संघात सामील करून घेतले आहे. या ट्रेड डीलमध्ये सीएसकेने दोन मोठे स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा आणि इंग्लंडचा सॅम करनला राजस्थान रॉयल्सकडे सोपवत केली. जडेजाला सीएसकेने 18 कोटींमध्ये घेतले होते, मात्र ट्रेडनंतर आरआर त्यांना 14 कोटी देणार आहे. त्यामुळे जडेजाचे आर्थिक नुकसान झाले आहे.
SANJU SAMSON IS YELLOVE. 💛
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 15, 2025
Anbuden welcome, Chetta!🦁 #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/uLUfxIsZiU
सीएसकेसाठी सर्वात कठीण निर्णयांपैकी एक
सीएसकेचे व्यवस्थापकीय संचालक के. एस. विश्वनाथन यांनी मान्य केले की, हा निर्णय घेणे अत्यंत अवघड होता. जडेजा गेली दहा वर्षांपेक्षा जास्त काळ संघाचा कणा राहिलेला आहे, तर सॅम करनही संघासाठी महत्त्वाचा भाग होता. अशा दोन स्टारांना सोडणे हे त्यांच्या मते सीएसकेच्या इतिहासातील कठीण निर्णयांपैकी एक आहे. त्यांनी स्पष्ट केले की हा निर्णय जडेजा आणि करन या दोघांच्या सहमतीने घेण्यात आला. त्यांच्या योगदानाबद्दल त्यांनी दोघांचे आभार मानले आणि पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
“Decision taken on mutual agreement with Jadeja and Curran.” - CSK MD Kasi Viswanathan speaks on the trade. #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/8HAZrdIBJP
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 15, 2025
CSK मधील जडेजाचे अमूल्य योगदान
रवींद्र जडेजा 2012 पासून सीएसकेचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने 2018, 2021 आणि 2023 मध्ये संघाला आयपीएलचे विजेतेपद जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जडेजाने सीएसकेसाठी150 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत आणि 2,300 हून अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान, इंग्लिश अष्टपैलू खेळाडू सॅम करनने सीएसकेसाठी 28 आयपीएल सामने खेळले, 356 धावा केल्या आणि 23 विकेट्स घेतल्या. तो 2021 च्या आयपीएल विजेत्या संघाचाही भाग होता.
200 Matches
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 15, 2025
2354 Runs
152 wickets
94 catches
When history speaks of courage in Yellove,
it will echo your name. 💛⚔️
Thank You, Ravindra Jadeja! 🫡#WhistlePodu #ThalapathyForever pic.twitter.com/WNMlgSOIgD
संजू सॅमसनची एंट्री
संजू सॅमसन 4500 पेक्षा जास्त आयपीएल धावांसह मोठा अनुभव घेऊन सीएसकेमध्ये दाखल होत आहे.
गत दहा वर्षांत त्याने दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व केले असून, 2021 ते 2025 दरम्यान तो आरआरचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वात आरआर 2022 मध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता.
From God's Own Country to Lion's Own Den! 💛
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 15, 2025
സ്വാഗതം, സഞ്ജു! #WhistlePodu #Yellove 🦁💛 pic.twitter.com/PHgbaMLk3B
हे ही वाचा -




















