एक्स्प्लोर

Ravichandran Ashwin: अश्विननं हरभजन सिंहचा विक्रम मोडला; कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला तिसरा भारतीय

IND vs NZ: अश्विननं 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कानपूर येथे खेळण्यात आलेला पहिला कसोटी सामना अनिर्णित ठरलाय. मात्र, या सामन्यात भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनं (Ravichandran Ashwin) नव्या विक्रमाला गवसणी घातलीय. या सामन्यातील अखेरच्या दिवशी अश्विननं टॉम लॅथमची विकेट घेऊन भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंहचा (Harbhajan Singh) विक्रम मोडीत काढलाय.

न्यूझीविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात अश्विननं त्याच्या कारकिर्दीतील 418 वा विकेट्स मिळवलाय. या कामगिरीसह तो भारताकडून कसोटी सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरलाय. या यादीत हरभजन सिंह तिसऱ्या क्रमांकावर होता. त्याच्या नावावर 417 विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. त्यानं 103 कसोटी सामन्यात अशी कामगिरी करून दाखवली होती. मात्र, अश्विननं केवळ 80 व्या कसोटी सामन्यात 418 वा विकेट्स पटकावून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाच्या यादीत तिसऱ्या स्थानी झेप घेतलीय.

Ravichandran Ashwin: अश्विननं हरभजन सिंहचा विक्रम मोडला; कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला तिसरा भारतीय

भारताकडून सर्वाधिक कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेंच्या नावावर आहे. त्यांनी 132 कसोटी सामन्यात 619 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर कपिल देव यांचा क्रमांक लागतो. त्यांच्या नावावर 434 विकेट्सची नोंद आहे.

अश्विननं 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत पदार्पण केलं होतं. त्यानं गोलंदाजीसह फलंदाजीत आपली जादू दाखवली आहे. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 2 हजार 85 धावा केल्या आहेत. ज्यात पाच शतकांचा समावेश आहे. त्यानं भारतासाठी 111 एकदिवसीय सामन्यात 150 विकेट्स घेतले आहेत. तर, 51 टी-20 मध्ये 61 विकेट्स घेतले आहेत.

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur News: शेफ विष्णू मनोहरांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, फेसबुक अकाउंट हॅक; पेजवरील अश्लील मजकुर
शेफ विष्णू मनोहरांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, फेसबुक अकाउंट हॅक; पेजवरील अश्लील मजकुर
फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारी नाव बुडाली, 25 जणांचा मृत्यू, काँगोमध्ये मोठी दुर्घटना 

Maharashtra Weather Update: राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 6 AM : ABP Majha : Maharashtra NewsMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 6.30 AM : 11 March 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : Maharashtra News : ABP MajhaSpecial Report | Ajit pawar Budget | अर्थसंकल्पात कवितांची मैफल,दादांच्या कवितांनी उपस्थितांचं मनोरंजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur News: शेफ विष्णू मनोहरांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, फेसबुक अकाउंट हॅक; पेजवरील अश्लील मजकुर
शेफ विष्णू मनोहरांना भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर, फेसबुक अकाउंट हॅक; पेजवरील अश्लील मजकुर
फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारी नाव बुडाली, 25 जणांचा मृत्यू, काँगोमध्ये मोठी दुर्घटना 
फुटबॉल खेळाडूंना घेऊन जाणारी नाव बुडाली, 25 जणांचा मृत्यू, काँगोमध्ये मोठी दुर्घटना 
Maharashtra Weather Update: राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
राज्यभरात तापमानाचा भडका! विदर्भातील 'या' जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय? 
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
मावळत्या सूर्यकिरणांची तिरीप बुद्धांच्या चेहऱ्यावर रेंगाळताना.. वेरूळ लेणीत किरणोत्सवाची पर्वणी, Photos
निवडणुकांपूर्वी SBI च्या तक्रारीवरुन ईडीने छापा मारला, पण आता कुठलीही फसवणूक झाली नसल्याचं पत्र

मुंबईकरांनो, उष्माघात टाळण्यासाठी BMC च्या मार्गदर्शक सूचना; महापालिकेचा सल्ला, काय करावं-काय करु नये?

मोठी बातमी! नोटबंदीवेळी जप्त केलेल्या जुन्या 500 अन् 1000 च्या नोटा जमा करुन घ्या, हायकोर्टाचे RBI ला निर्देश

तुझं नाटक मीच बघेन, बर का?; आ. संदीप क्षीरसागरांचा तहसीलदारांना दम; खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल

Embed widget