1312 विकेट्स अन् 10 हजारांहून अधिक धावा; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात घातक जोडी कोणती?
Ravichandran Ashwin And Ravindra Jadeja: रविचंद्रन अश्विनने 2010 मध्ये भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
Ravichandran Ashwin And Ravindra Jadeja: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनला (Ravichandran Ashwin) बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात आला. या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने धमाकेदार शतकासह दुसऱ्या डावात 6 विकेट्स पटकावल्या. दुसरीकडे, रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) 86 धावांची खेळी खेळण्याव्यतिरिक्त सामन्यात एकूण 5 विकेट्स घेतल्या. हे दोन अष्टपैलू खेळाडू एक दशकाहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाची प्रमुख ताकद आहेत.
अश्विन-जडेजाच्या एकुण 1312 विकेट्स-
रविचंद्रन अश्विनने 2010 मध्ये भारतासाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये एकूण 281 सामने खेळले असून त्यात त्याने 744 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय रविचंद्रन अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांपैकी एक आहे. दुसरीकडे, रवींद्र जडेजा 2009 मध्ये टीम इंडियामध्ये सामील झाला होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक शतके झळकावण्याबरोबरच, त्याने विकेट्सची मालिका घेतल्यानंतरही भारतासाठी चमकदार कामगिरी केली. जडेजाने 343 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण 568 विकेट्स घेतल्या आहेत. म्हणजेच रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने मिळून 1,312 विकेट घेतल्या आहेत.
रविचंद्रन अश्विन-रवींद्र जडेजा जोडी फलंदाजीतही अव्वल-
रविचंद्रन अश्विन-रवींद्र जडेजा ही जोडी केवळ गोलंदाजीतच नाही तर फलंदाजीतही भारतीय संघाची ताकद आहे. रविचंद्रन अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील तिसऱ्या डावात वेस्ट इंडिजविरुद्ध 103 धावांची खेळी केली. आतापर्यंत रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 6 शतके आणि 15 अर्धशतके झळकावून 4,313 धावा केल्या आहेत. कसोटी विक्रमांमध्ये रवींद्र जडेजा रविचंद्रन अश्विनच्या मागे असला तरी एकूण तिन्ही फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 6393 धावा आहेत. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने फलंदाजीत 10,706 धावा केल्या आहेत.
रोहित शर्माकडून रविचंद्रन अश्विचं तोंडभरुन कौतुक-
लाल मातीची विकेट गोलंदाजांसाठी नेहमीच उपयुक्त असते. पण जर तुम्ही फलंदाज असाल तर तुम्हाला संयम दाखवावा लागेल. या खेळपट्टीवर आमच्या खेळाडूंनी खूप संयम दाखवला. दबावात आमचे खेळाडू चांगले खेळले. विशेषत: रविचंद्रन अश्विनची फलंदाजी कौतुकास्पद आहे. गोलंदाजीशिवाय रविचंद्रन अश्विनने फलंदाजीतही आम्हाला योगदान दिले आहे. हे त्याने याआधी देखील अनेकदा केले आहे. तुम्ही रविचंद्रन अश्विनला या खेळापासून दूर ठेवू शकत नाही, असं रोहित शर्माने सांगितले.
संबंधित बातमी:
वडिलांना पोराचं कौतुक, रोहित-विराटची मिठी; बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर सगळेच भावूक, Photo
WTC च्या फायनलसाठी टीम इंडियाचा दावा मजबूत; पहिलं स्थान कायम, पुन्हा ऑस्ट्रेलिया नशिबी येणार?