RR Squad IPL 2026 Auction : वैभव सूर्यवंशी अन् यशस्वी जैस्वाल सलामीवीर, तर रवींद्र जडेजा....; शक्तिशाली राजस्थान रॉयल्सचा Full Squad, IPL 2026 साठी अशी असेल आरआरची Playing XI
Rajasthan Royals Squad IPL 2026 Auction : राजस्थान रॉयल्सकडे एकाहून एक ताकदवान फलंदाजांची फौज आहे. ज्यात वैभव सूर्यवंशी...जो गेल्या वर्षभरापासून आपल्या स्फोटक कामगिरीमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

Rajasthan Royals Squad IPL 2026 : आयपीएल 2026 साठी सर्व 10 संघांनी आपली रणनिती तयार केली आहे. मंगळवारी (16 डिसेंबर) अबू धाबीमध्ये आयपीएल 2026 ची मिनी लिलाव झाला. या लिलावात 10 फ्रँचायझींनी एकूण 77 खेळाडूंवर तब्बल 215.45 कोटी रुपयांची बोली लावली. दरम्यान, राजस्थान रॉयल्सबद्दल बोलायचं झालं, तर आयपीएल 2026 मिनी लिलावात आरआरने सर्वात मोठी बोली फिरकीपटू रवि बिश्नोईवर लावली. राजस्थानने पैसा खर्च करत बिश्नोईला 7.20 कोटी रुपयांना आपल्या संघात सामील करून घेतले.
राजस्थान रॉयल्सची ताकद
राजस्थान रॉयल्सकडे एकाहून एक ताकदवान फलंदाजांची फौज आहे. या यादीत सर्वात आघाडीवर नाव आहे वैभव सूर्यवंशीचं, जो गेल्या वर्षभरापासून आपल्या स्फोटक कामगिरीमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. अवघ्या 14 वर्षांचा हा खेळाडू पुढील हंगामातही धमाकेदार खेळी करेल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय रवींद्र जडेजा आणि सॅम करनसारख्या अष्टपैलू खेळाडूंमुळे संघाचा समतोल अधिक मजबूत झाला आहे.
राजस्थान रॉयल्सची कमजोरी
राजस्थान रॉयल्ससमोरील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कर्णधारपदाचा. संजू सॅमसनच्या जागी नवीन कर्णधार कोण असेल, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. आयपीएल 2026 मध्ये रवींद्र जडेजा ही मोठी जबाबदारी स्वीकारू शकतो, मात्र आयपीएलमधील त्याचा कर्णधार म्हणूनचा विक्रम फारसा प्रभावी राहिलेला नाही. कर्णधारपदाच्या शर्यतीत यशस्वी जैस्वाल आणि रियान पराग यांचीही नावे चर्चेत आहेत.
राजस्थान रॉयल्सने रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी- (RR retained player list)
रवींद्र जडेजा, कुणाल राठोड, लुआन-ड्रे प्रिटोरियस, शिमरन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, युद्धवीर सिंह चरक, जोफ्रा आर्चर, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय सिंह, शुभम दुबे, नंद्रे बर्गर, वैभव सूर्यवंशी, तुषार देशपांडे, फजलहक फारूकी, क्वेना मफाका, अशोक शर्मा, सॅम करन, डोनोव्हन फरेरा.
राजस्थान रॉयल्सने खेळाडूंना रिलीज केले - (RR released player list)
कुणाल सिंग राठोड, नितीश राणा, संजू सॅमसन, वानिंदू हसरंगा, महेश टेकश्ना, फजलहक फारुकी, आकाश मधवाल, अशोक शर्मा, कुमार कार्तिकेय.
राजस्थान रॉयल्सने ट्रेडद्वारे खरेदी केलेले खेळाडू- (rr Trade player list)
रवींद्र जडेजा, डोनोव्हन फरेरा, सॅम करन
राजस्थान रॉयल्सने लिलावात या खेळाडूंना खरेदी केले :
रवी बिश्नोई - 7.20 कोटी
सुशांत मिश्रा - 90 लाख
यशराज पुंजा - 30 लाख
विघ्नेश पुथूर - 30 लाख
रवी सिंग - 95 लाख
अमन राव - 30 लाख
ब्रिजेश शर्मा - 30 लाख
ॲडम मिलने - 2.4 कोटी
कुलदीप सेन - 75 लाख
राजस्थान रॉयल्सचा संघ- (IPL 2026 RR Full Squad)
रवींद्र जडेजा, सॅम करन, डोनोवन फरेरा, संदीप शर्मा, शुभम दुबे, वैभव सूर्यवंशी, लुआन-ड्राईस प्रिटोरियस, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, युधवीर सिंग चरक, जोफ्रा आर्चर, तुषार देशपांडे, क्विना मफाका, नांद्रे बर्गर, रवी बिश्नोई, सुशांत मिश्रा, यशराज पुंजा, विघ्नेश पुथूर, रवी सिंग, अमन राव, ब्रिजेश शर्मा, ॲडम मिल्ने, कुलदीप सेन.
आयपीएल 2026 साठी राजस्थान रॉयल्सची कशी असेल Playing XI- (RR Playing XI IPL 2026)
वैभव सूर्यवंशी, यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), शिमरोन हेटमायर, रवींद्र जडेजा, सॅम करन, रवी बिश्नोई, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर.





















