एक्स्प्लोर

PCB Central Contracts : PCB ची केंद्रीय करार यादी जाहीर, अनेक दिग्गज खेळाडूंची सुट्टी; बाबर आझमला किती मिळणार पगार?

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2024-25 आंतरराष्ट्रीय हंगामासाठी आपला केंद्रीय करार जाहीर केला आहे.

Pakistan Cricket Board Central Contracts : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2024-25 आंतरराष्ट्रीय हंगामासाठी आपला केंद्रीय करार जाहीर केला आहे. यामध्ये 25 पुरुष क्रिकेटपटूंना 12 महिन्यांसाठी केंद्रीय करार देण्यात आला आहे. हा करार 1 जुलै 2024 पासून अंमलात येईल. पीसीबीने प्रथमच पाच नवीन खेळाडूंचा केंद्रीय करारात समावेश केला आहे.

बाबर आझमचा अ श्रेणीमध्ये समावेश 

खुर्रम शहजाद, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद इरफान खान आणि उस्मान खान यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने प्रथमच केंद्रीय करार दिला आहे. या पाचही खेळाडूंना ड श्रेणीत ठेवण्यात आले आहे. पीसीबीने केवळ दोन खेळाडूंना श्रेणी-अ मध्ये ठेवले आहे. यामध्ये बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांचा समावेश आहे. 

तर तीन खेळाडूंचा ब श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. यामध्ये नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि शान मसूद यांचा समावेश आहे. अलीकडेच मसूदच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली. पाकिस्तानने 2021 नंतर घरच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकली होती.

3 स्टार खेळाडूंची सुट्टी 

हसन अली, सर्फराज अहमद आणि फखर जमान या स्टार खेळाडूंचा पीसीबीच्या केंद्रीय करारात समावेश करण्यात आलेला नाही. या खेळाडूंना काही काळ चांगली कामगिरी करता आली नाही. कदाचित याच कारणामुळे त्यांना करारातून सुट्टी देण्यात आली आहे. दुसरीकडे, गेल्या वर्षी शाहीन आफ्रिदीचा अ श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला होता. यावेळी त्याला ब श्रेणीत ठेवण्यात आले आहे. शादाब खानलाही बी मधून क श्रेणीत आला आहे.

पीसीबीने जाहीर केलेल्या केंद्रीय करारातील खेळाडूंची यादी :

श्रेणी-अ : बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान
श्रेणी-ब : नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी आणि शान मसूद
श्रेणी-क : अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, हारिस रौफ, नोमान अली, सैम अयुब, साजिद खान, सलमान अली आगा, सौद शकील आणि शादाब खान.
श्रेणी-ड : आमिर जमाल, हसिबुल्ला, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद इरफान खान, मोहम्मद वसीम जूनियर आणि उस्मान खान.

पाकिस्तानी खेळाडूंना किती पगार मिळतो? (How much salary do Pakistani cricketers get)

अहवालानुसार, श्रेणी A मध्ये समाविष्ट असलेल्या खेळाडूंना दरमहा 4.5 दशलक्ष म्हणजे समारे 13.14 लाख कमावतात. ब श्रेणीतील खेळाडूंना दरमहा 3 दशलक्ष अंदाजे 8.76 लाख पाकिस्तानी रुपये वेतन मिळते, तर श्रेणी C आणि D मधील खेळाडूंना 1.5 दशलक्ष पाकिस्तानी रुपये म्हणजे अंदाजे 4.38 लाख दरमहा पगार मिळतो.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bandra Terminus Stampede CCTV | वांद्रे टर्मिनल चेंगराचेंगरीचा CCTV व्हिडिओ आला समोर
Bandra Terminus Stampede CCTV | वांद्रे टर्मिनल चेंगराचेंगरीचा CCTV व्हिडिओ आला समोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत भाजपमध्ये बंडखोरीची वात पेटली, जिल्ह्यात 3 ठिकाणी बंडाचा बावटा फडकला
सांगलीत भाजपमध्ये बंडखोरीची वात पेटली, जिल्ह्यात 3 ठिकाणी बंडाचा बावटा फडकला
Bandra Terminus Stampede: वांद्रे टर्मिनसवरील भयंकर चेंगराचेंगरीचं CCTV फुटेज समोर, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्यं
वांद्रे टर्मिनसवरील भयंकर चेंगराचेंगरीचं CCTV फुटेज समोर, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्यं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोथरुड विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी, चंद्रकांत पाटलांचं टेन्शन वाढलं? अमोल बालवडकर उमेदवारी अर्ज भरणार
कोथरुड विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी, चंद्रकांत पाटलांचं टेन्शन वाढलं? अमोल बालवडकर उमेदवारी अर्ज भरणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bandra Terminus Stampede CCTV | वांद्रे टर्मिनल चेंगराचेंगरीचा CCTV व्हिडिओ आला समोरABP Majha Marathi News Headlines 8 PM TOP Headlines 8 PM 28 Sep 2024Top 70 at 7AM 28 Oct 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याABP Majha Headlines : 7 AM : 28 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bandra Terminus Stampede CCTV | वांद्रे टर्मिनल चेंगराचेंगरीचा CCTV व्हिडिओ आला समोर
Bandra Terminus Stampede CCTV | वांद्रे टर्मिनल चेंगराचेंगरीचा CCTV व्हिडिओ आला समोर
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सांगलीत भाजपमध्ये बंडखोरीची वात पेटली, जिल्ह्यात 3 ठिकाणी बंडाचा बावटा फडकला
सांगलीत भाजपमध्ये बंडखोरीची वात पेटली, जिल्ह्यात 3 ठिकाणी बंडाचा बावटा फडकला
Bandra Terminus Stampede: वांद्रे टर्मिनसवरील भयंकर चेंगराचेंगरीचं CCTV फुटेज समोर, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्यं
वांद्रे टर्मिनसवरील भयंकर चेंगराचेंगरीचं CCTV फुटेज समोर, काळजाचा थरकाप उडवणारी दृश्यं
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोथरुड विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी, चंद्रकांत पाटलांचं टेन्शन वाढलं? अमोल बालवडकर उमेदवारी अर्ज भरणार
कोथरुड विधानसभेत भाजपमध्ये बंडखोरी, चंद्रकांत पाटलांचं टेन्शन वाढलं? अमोल बालवडकर उमेदवारी अर्ज भरणार
VBA Candidate List : वंचित बहुजन आघाडीची आठवी यादी जाहीर, किती जणांना संधी; अमित ठाकरे, रोहित पाटलांविरुद्ध उमेदवार जाहीर
वंचितची विधानसभा निवडणुकीसाठी आठवी यादी जाहीर, अमित ठाकरे, रोहित पाटील यांच्या विरोधात उमेदवार
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Embed widget