IND vs AUS : चौथ्या कसोटीतही स्टीव्ह स्मिथच करणार ऑस्ट्रेलियाचं नेतृत्त्व, पॅट कमिन्स आजारी आईसोबत सिडनीमध्येच राहणार
India vs Australia : पहिल्या दोन कसोटी सामन्यात पराभवानंतर तिसऱ्या कसोटीत स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरला पॅट त्याच्या घरगुती कारणांमुळे हा सामना खेळू शकला नाही.
Ind vs Aus, Test : टीम इंडियाविरुद्ध (Team India) सुरु कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया संघ चौथ्या कसोटीतही स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यालाच कर्णधार म्हणून मैदानात उतरवणार आहे. संघाचा फुलटाईम कर्णधार पॅट कमिन्स पहिल्या दोन सामन्यानंतर तिसऱ्या सामन्यापूर्वी सिडनीला परताल. त्याच्या आईचा कॅन्सरवर उपचार सुरु असल्याने तो पुन्हा मायदेशी परतला. दरम्यान चौथ्या कसोटीसाठीही तो परतणार नसल्याने स्मिथच संघाचं नेतृत्त्व करेल. या मालिकेत भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला (Team Australia) पहिल्या दोन सामन्यात मात दिली. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात कांगारुंनी विजय मिळवत मालिकेत पुनरागमन केलं आहे. आता चौथा सामना हा मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक असणार आहे. कसोटी मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी पॅट परतल्यास तो संघाचं नेतृत्त्व करेल. पण एकंदरीत परिस्थिती पाहता तो वन-डे मालिकेसाठीही परतेल असं वाटत नसल्याने स्मिथच एकदिवसीय मालिकेतही कर्णधार असू शकतो.
आता दोन्ही संघांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियन संघानं शानदार विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (2021-23) अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याचबरोबर या पराभवामुळे भारतीय संघाची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. आता अहमदाबाद कसोटी जिंकणं भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचं असेल. अहमदाबादमध्ये भारतीय संघ जिंकला तर अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क करेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिली किंवा ऑस्ट्रेलिया जिंकली तरीही टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचू शकते. पण, यासाठी टीम इंडिया देवाचा धावा करावा लागेल. कारण अशा परिस्थितीत टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन शिपची फायनल गाठायची असेल, तर न्यूझीलंडनं श्रीलंकेविरुद्धचा एक तरी सामना जिंकणं किंवा अनिर्णित ठेवणं गरजेचं आहे. तरच टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होणार आहे. असं असलं तरी घरच्या मैदानावर होणाऱ्या दोन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडला हरवणं श्रीलंकेसाठी खूप कठीण असेल. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 मार्चपासून खेळवला जाणार आहे.
ऑस्ट्रेलियाची WTC फायनलमध्ये एन्ट्री
इंदूर कसोटी सामन्यानंतर, ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाविरुद्धचा शेवटचा सामना गमावल्या तरिही ऑस्ट्रेलिया फायनल्समध्ये आपल्या स्थानी स्थिर असेल. ऑस्ट्रेलियन संघाला सध्या 68.52 टक्के गुण आहेत, तर भारतीय संघ 60.29 टक्के गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर अनुक्रमे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ओव्हल येथे 7 जूनपासून खेळवला जाणार आहे.
हे देखील वाचा-