Shahid Afridi Video : भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या शाहिद आफ्रिदीला पाकिस्तानी लोकांकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण; पाहा जुना व्हिडीओ
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारतीय सैन्याबद्दल अनेक वादग्रस्त वक्तव्य केले.

Shahid Afridi Video Viral : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण भारत देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारतीय सैन्याबद्दल अनेक वादग्रस्त वक्तव्य केले. ज्यावर माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने त्याला कडक शब्दांत फटकारले होते. त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल केले जाते. यादरम्यान, आता आफ्रिदीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पाकिस्तानचे लोक त्याला बेदम मारहाण करताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ शिखर धवनच्या नावाने असलेल्या एका पॅरोडी अकाउंटवरून X वर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये त्याने एका चाहत्याला थप्पड मारली. त्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या पाकिस्तानी लोकांकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पाकिस्तानचे लोक त्याचा पाठलाग करत आहेत आणि त्याला मारत आहे. आफ्रिदी आपला जीव वाचवण्यासाठी पळत आहे.
व्हिडिओ कधीचा आहे?
खरंतर, हा व्हिडिओ 23 मार्च 2012 चा असल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी सामना हरल्यानंतर पाकिस्तान संघ कराची विमानतळावर पोहोचला तेव्हा गर्दीने त्यांना घेरले होते. एका व्यक्तीने अशी टिप्पणी केली की आफ्रिदी संतापला.
Tu mujhe kya chai pilayega bkl,tujhe to khud ke log chai nahi pilatepic.twitter.com/hoE1W9NFqT https://t.co/m2bSgiNC58
— Shikkar Dhawen🐦 (@76off43) April 29, 2025
आफ्रिदीने भारताविरुद्ध ओकले विष?
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. ज्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानात आश्रय घेतलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या सहयोगी टीआरएफने घेतली. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली. यावर, शाहिद आफ्रिदीने एक व्हिडिओ जारी केला आणि म्हटले की जर भारतात फटाके फुटले तर त्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे. तुमच्याकडे 8 लाखांची फौज आहे, तरीही काश्मीरमध्ये हे घडले. याचा अर्थ असा की तुम्ही लोकांना सुरक्षा देण्यास असमर्थ आहात.
शिखर धवनला फटकारले
यावर माजी क्रिकेटपटू शिखर धवनने त्यांच्यावर टीका केली. शाहिद आफ्रिदीला टोला लगावताना त्यांनी X वर लिहिले, 'आम्ही तुला कारगिलमध्ये हरवले, तू इतका खाली पडला आहेस, तू आणखी किती खाली पडशील?' अनावश्यक टिप्पण्या देण्याऐवजी, तुमच्या देशाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करणे चांगले. आम्हाला आमच्या भारतीय सैन्याचा खूप अभिमान आहे. जय हिंद!
हे ही वाचा -
















