एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 'राज ठाकरेंची Congress सोबत घेण्याची इच्छा', Sanjay Raut यांचा मोठा दावा!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संभाव्य युतीच्या चर्चेदरम्यान खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक मोठं विधान केलं आहे. 'स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की, आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सुद्धा सोबत घेणे गरजेचे आहे,' असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. राऊत यांच्या या भूमिकेवर काँग्रेस आणि मनसेने मात्र वेगवेगळी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीमध्ये नवीन घटक पक्ष घ्यायचा असेल, तर एकत्र बसून चर्चा करावी लागेल आणि काँग्रेसचे नेतृत्व दिल्लीत असल्याने अंतिम निर्णय तेच घेतील, असे काँग्रेसने म्हटले आहे. तर, आमच्या पक्षाची भूमिका फक्त राज ठाकरेच ठरवतात, असे मनसे नेत्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे मनसेला महाविकास आघाडीत घेण्यासाठी संजय राऊत यांनाच घाई झाली आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र
Sanjay Khodke On Navneet Rana Amravati : दुसऱ्याच्या प्रचाराला, मग भाजपावर विश्वास का ठेवावा?
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















