एक्स्प्लोर

Champions Trophy 2025: टीम इंडिया पाकिस्तान दौऱ्यावर? चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल PCB ला सतावतेय भीती

Champions Trophy 2025: पाकिस्तानला भिती आहे की, आशिया कप 2023 प्रमाणेच ही स्पर्धा देखील हायब्रीड मॉडेलनुसार आयोजित करावी लागेल. आणि पाकिस्तानला भिती वाटण्यासाठी भारतीय क्रिकेट संघच कारणीभूत आहे. 

India vs Pakistan, Champions Trophy 2025: पुढच्या वर्षी म्हणजेच, 2025 मध्ये ICC चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy) खेळवली जाणार आहे. याबाबत पाकिस्तानच्या (Pakistan) चिंतेत आधीच भर पडली आहे. यंदा ICC चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद पाकिस्तानकडे आहे. पण, याच गोष्टीमुळे पाकिस्तानच्या चिंतेत भर पडली आहे. पाकिस्तानला भिती आहे की, आशिया कप 2023 (Asia Cup 2023) प्रमाणेच ही स्पर्धा देखील हायब्रीड मॉडेलनुसार आयोजित करावी लागेल. आणि पाकिस्तानला भिती वाटण्यासाठी भारतीय क्रिकेट संघच (IND vs PAK) कारणीभूत आहे. 

आशिया चषक 2023 स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानकडे होतं, त्यावेळी टीम इंडियानं स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्यास विरोध दर्शवला होता. त्यावेळी टीम इंडियानं पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिल्यामुळे आशिया चषक हायब्रीड मॉडेल अंतर्गत आयोजित केला होता. पण जर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यास नकार दिला तर आशिया चषक 2023 प्रमाणेच ICC चॅम्पियन्स ट्रॉफीदेखील हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवावी लागू शकते. 

पुढच्या आठवड्यात ICC एग्झिक्युटिव्ह बोर्डाची मीटिंग 

आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल (ICC) एग्झिक्युटिव्ह बोर्डाची मीटिंग दुबईमध्ये पुढच्या आठवड्यात होणार आहे. यामध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) नवे चेअरमन मोहसिन नकवी आणि बीसीसीआय सेक्रेटरी जय शाह यांची भेट होऊ शकते. याच मीटिंगवेळी भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तान दौऱ्यावर येणार असल्याचं आश्वासन मिळावं, अशी इच्छा पाकिस्तानची आहे. 

चॅम्पियन्स ट्रॉफी पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणार आहे. अशा परिस्थितीत, आतापासून पीसीबीला बीसीसीआयकडून कोणत्याही प्रकारचं आश्वासन मिळणं कठीण आहे. दरम्यान, त्यांच्या सर्व सदस्य देशांना आयसीसी स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागतो. पण भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तान दौऱ्यासाठी सरकारची परवानगी लागेल. तर अशा मान्यतेबाबतचा निर्णय स्पर्धेच्या काही आठवड्यांपूर्वीच घेतला जाऊ शकतो, त्यामुळे आयसीसीच्या बैठकीत आश्वासन मिळवण्याच्या पाकिस्तानच्या अपेक्षांवर पाणी फिरणार हे मात्र नक्की. 

भारताला समजावण्यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू 

पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी बोर्डाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "भारत टीम इंडियाला पाकिस्तान दौऱ्यावर पाठवणार की, आशिया चषक 2023 सारखीच परिस्थिती पुन्हा उद्भवणार, हेच पीसीबीचं सर्वात मोठं टेन्शन आहे. पाकिस्तानी टीम वनडे वर्ल्ड कप 2023 साठी भारत दौऱ्यावर होती. त्यासोबतच (चॅम्पियंस ट्रॉफी) देखील आयसीसी टूर्नामेंट आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) नवे चेअरमन मोहसिन नकवी बीसीसीआय आणि आयसीसी यांची समजूत घालण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या प्रमोशनसाठी मदत मिळेल. नकवी BCCI ला हादेखील विश्वास देणार आहेत की, पाकिस्तानात निवडणूक पार पडली असून नवं सरकार आलं आहे. अशातच सुरक्षेसंदर्भातील कोणत्याही बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. 

BCCI चं PCB ला सडेतोड उत्तर 

पीटीआयनं चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत बीसीसीआयच्या सूत्रांशी संवाद साधला. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान दौऱ्यावर जाण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी गरजेची आहे. याबाबतचा निर्णय भारत सरकारच घेऊ शकते. तसेच, आत्ताच सरकारकडे परवानगी मागणं खूपच घाई होईल. जर पाकिस्तानचे नवे चेअरमन मार्च 2024 मध्येच फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये होणाऱ्या टुर्नामेंटसाठी आश्वासन मागत असतील, तर ते खूपच मोठ्या गैरसमजात आहेत. 

दरम्यान, टीम इंडियानं 2008 मध्ये सर्वात शेवटी पाकिस्तान दौरा केला होता. त्यावेळी हा दौरा आशिया कपसाठी होता. त्यानंतर पाकिस्तानचा संघ 3 वेळा ICC इव्हेंटसाठी भारतात आला आहे. 2011 वर्ल्डकप, 2016 टी20 वर्डकप भारतात खेळवण्यात आला. त्यानंतर 2012 मध्ये पाकिस्तानचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. पण, 2008 नंतर मात्र भारतीय संघ एकदाही पाकिस्तान दौऱ्यावर गेलेला नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

बरं झालं, सरफराजनं रोहितचं ऐकून हेल्मेट घातलं, नाहीतर...; नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना वसुलीचा धसका, लाभ नाकारण्यासाठी स्वत:हून अर्ज ABP MAJHASaif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघडSaif Ali Khan CCTV : तोंड बांधून दबक्या पावलांनी आला, सैफच्या हल्लेखोराचा नवा CCTV!Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
पुणे-नाशिक महामार्गावर अपघातात एकाच गावातील पाच जणांवर काळाचा घाला; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं नेमकं काय घडलं?
Jallikattu in Tamil Nadu : तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
तामिळनाडूत जल्लीकट्टूमुळे 1 दिवसात 7 जणांचा मृत्यू; बैल मालक आणि प्रेक्षकांसह 400 हून अधिक जखमी; 2 बैलांनी सुद्धा जीव गमावला
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Case Update :सैफच्या पाठीवर ऑपरेशन करुन काढलेला चाकूचा तुकड्याचा फोटो उघड
Saif Ali Khan Attacked Case:
"बॉलिवूडवालों डरना..."; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांचं मोठं वक्तव्य
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Embed widget