Champions Trophy : मोठी बातमी, चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडू, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची धमकी, आयसीसीपुढं नवी अट ठेवली
Champions Trophy : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं नवी भूमिका घेतली आहे. पाकिस्तानातून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा दुसऱ्या देशात आयोजित केल्यास स्पर्धेतून बाहेर पडू अशी धमकी पीसीबीनं दिली आहे.
Pakistan may withdraw ICC Champions Trophy 2025 नवी दिल्ली: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनावरुन जोरदार चर्चा आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयनं टीम इंडिया चॅम्पियन्स ट्राफीसाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचं आयसीसीला कळवलं आहे. आयसीसीनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला ईमेलद्वारे कळवलं आहे. त्यामध्ये भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी पाकिस्तानला येणार नाही, हे सांगण्यात आलं आहे. आता हे प्रकरण पाकिस्तान सरकार पर्यंत पोहोचलं आहे. पाकिस्तानमधील एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार भारतीय संघ पाकिस्तानमध्ये येणार नसल्यास पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेऊ शकते. याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन दुसऱ्या देशात करण्यात आलं तर त्यातून माघार देखील घेण्याचा निर्णय पीसीबी कडून घेतला जाऊ शकतो.
द डॉनच्या हवाल्यानुसार सूत्रांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सरकार या पर्यायावर देखील विचार करत आहे की जर भारतीय टीम चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी त्यांच्या देशात गेली नाही अथवा स्पर्धा दुसऱ्या देशात खेळवण्यात आली तर पाकिस्तान या स्पर्धेतून बाहेर पडू शकते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहमसीन रजा नकवी यांनी हायब्रीड मॉडेलला नकार दिला आहे. पाकिस्तान सरकार देखील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाबाबत गांभीर्यानं विचार करत असल्याचं पाहायला मिळतंय.
आयसीसीपुढं नवा पेच
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील राजकीय संबंध पाहता बीसीसीआयनं टीम इंडियाला चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी होण्यास पाठवायचं की नाही याबाबतचा निर्णय भारत सरकारवर सोपवला आहे. भारतानं 2008 नंतर पाकिस्तानसोबत द्वीपक्षीय मालिका खेळलेली नाही. भारतानं गेल्या 17 वर्षात पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. मात्र, पाकिस्तानची टीम आशिया कप आणि आयसीसीच्या स्पर्धा खेळण्यासाठी भारतात आली होती. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून भारत सरकारची भूमिका पाहता आगामी काळात आयसीसीच्या स्पर्धेत भारताविरुद्ध एकही मॅच न खेळण्याचा निर्णय घेतला जाऊ शकते.
पेच कसा सुटणार?
भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार नसल्यानं चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण्यासाठी दोन पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हायब्रीड मॉडेलचा विचार करावा लागेल. हायब्रीड मॉडेल अंतर्गत भारताचे सामने दुबई किंवा श्रीलंकेत आयोजन केलं जाऊ शकतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं हायब्रीड मॉडेलला तयारी दर्शवली नाही तर भारताला स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. ही स्थिती निर्माण झाल्यास श्रीलंकेला चॅम्पियन ट्रॉफीत खेळण्याची संधी मिळेल. मात्र, भारत चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार नसल्यास आयसीसीला आर्थिक फटका बसण्याची भीती आहे.
इतर बातम्या :