Imran Khan Attack : बाबर आझम म्हणतो, 'अल्लाह कप्तान को सुरक्षित रखे', इम्रान खान यांच्यावर गोळीबारानंतर पाकिस्तानी क्रिकेटर्सच्या प्रतिक्रिया
Pakistan Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांची रॅली सुरू असताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून त्यामध्ये ते जखमी झाले आहेत.
Imran Khan attempted to assassinate : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या रॅलीमध्ये गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना गुजरानवाला या ठिकाणी घडली आहे. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाली असून या घटनेनंतर संपूर्ण पाकिस्तान हादरलं आहे. सर्व स्तरातून या घटनेचा निषेध होत असून पाकिस्तानचे आजी-माजी क्रिकेटर्स यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. कर्णधार बाबर आझमने 'हा भ्याड हल्ला असून अल्लाह आमच्या कॅप्टनना सुखरुप ठेवो' असं ट्वीट केलं आहे. त्याशिवाय शोएब अख्तरने देखील एक व्हिडीओ पोस्ट करत या घटनेचा निषेध केला असून वसिम अक्रमनेही आमच्या प्रार्थना इम्रान खान यांच्यासोबत असल्याचं ट्वीट करत म्हटलं आहे.
इम्रान खान यांची गुजरानवाला येथे रॅली सुरु असताना काही हल्लेखोरांनी गोळीबार केला. खान यांच्यावर चार ते पाच हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं समोर आलं असून त्यापैकी एका आरोपीला अटक देखील करण्यात आली. इम्रान खान यांना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्या पायाला जखम झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या हल्ल्य़ाचा निषेध करत सध्या संघाचा कर्णधार असणाऱ्या बाबरने ट्वीट करत लिहिलं आहे की, "मी या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. अल्लाह आमच्या कॅप्टनला सुरक्षित ठेवो आणि आमच्या लाडक्या पाकिस्तानचे रक्षण करो."
Strongly condemn this heinous attack on @ImranKhanPTI. May Allah keep Kaptaan safe and protect our beloved Pakistan, Ameen.
— Babar Azam (@babarazam258) November 3, 2022
माजी क्रिकेटर शोएब अख्तरनेही यावर आपली प्रतिक्रिया देत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओत शोएब म्हणतो, ''मी टीव्हीवर पाहतोय की इम्रान भाई यांच्यावर गोळीबार झाल्याची अत्यंत अस्वस्थ करणारी बातमी येत आहे. पायात गोळी लागली असेल तर काळजी करण्यासारखे काही नाही, पण अल्लाह त्यांचे रक्षण करो. अशा गोष्टी थांबल्या पाहिजेत. अल्लाह पाकिस्तानचे रक्षण करो आणि आपण फार टोकावर पोहोचलो आहोत. आता हे सगळं थांबून काहीतरी ठाम निर्णय घेतला पाहिजे.''
पाह VIDEO
Heard about the attack on @ImranKhanPTI . Alhamdolillah he is fine and in good spirits. This clip of him is from after the attack.
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) November 3, 2022
I strongly condemn the attack. pic.twitter.com/VeFxFIYf8p
माजी क्रिकेटर वसिम अक्रमनेही ट्वीट केलं आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ''वजिराबादमधील घडामोडींनी मी व्यथित झालो आहे. इम्रान भाई आणि तिथे उपस्थित लोकांसोबत आमची प्रार्थना आहे. आपण एक देश म्हणून एकत्र आले पाहिजे आणि आपली राष्ट्रीय एकात्मता कोणालाही तोडू देऊ नये.''
Deeply disturbed about the events unfolding in Wazirabad . Our prayers with Imran BHAI and everyone there. We as a country must come together and not allow anyone to distort our national unity.
— Wasim Akram (@wasimakramlive) November 3, 2022
हे देखील वाचा-