एक्स्प्लोर

Pakistan Cricketer Haris Rauf Video: पायातील चप्पल काढून चाहत्याच्या अंगावर गेला...; नेमकं काय घडलं?, पाकिस्तानच्या हारिस रौफने सर्व सांगितलं!

Pakistan Cricketer Haris Rauf Video:  पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफचा एक व्हिडीओ कालपासून व्हायरल होत आहे.

Pakistan Cricketer Haris Rauf Video: पाकिस्तानचा क्रिकेट संघ (Pakistan Cricket Team) आणि त्यांच्या खेळाडूंसोबत सध्यातरी कोणत्याची चांगल्या गोष्टी होताना दिसत नाहीय. बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखालील पाकिस्तानी संघ 2024 च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत ग्रुप स्टेजमधून बाहेर पडला आहे. दुसरीकडे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफच्या (Haris Rauf Video) व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे.  हारिस रौफचा एक व्हिडीओ कालपासून व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो एका पाकिस्तानी चाहत्यावर धावून जात मारहाण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

अमेरिकेत पत्नीसोबत फिरत असताना हारिस रौफला चाहत्याने चिथावणी दिली. यानंतर तो खूपच अस्वस्थ झाला आणि त्याने चाहत्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रागात असलेला हारिस पायातील चप्पल काढून चाहत्याच्या अंगावर त्वेषाने धावून जाताना दिसला; मात्र तिथे असलेल्या इतर लोकांनी त्याला वेळीच अडवले. त्यामुळे दोघांमध्ये कोणतीही हाणामारी झाली नाही. दरम्यान, तू नक्कीच भारतीय असशील, पण हा काही भारत नाही, असे हारिसने त्या चाहत्याला म्हटले. पण त्याने मी पाकिस्तानी असल्याचे सांगितल्यानंतर हारिस रौफ त्याला अधिक शिवीगाळ करायला लागला. 

हारिस रौफ काय म्हणाला?

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हारिस रौफने स्पष्टीकरण दिलं आहे. हारिस रौफ म्हणाला की, मी ठरवलं होतं की ही गोष्ट सोशल मीडियावर टाकायची नाही. पण हा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. त्यामुळे तेव्हा नेमकं काय घडलं हे सांगणं भाग पडलं आहे. चाहत्यांना आमच्यावर टीका करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण कोणी जर माझ्या आईवडिलांवर गेला तर मी त्यावेळी प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या प्रोफेशनचा राग त्यांच्यावर काढू नये, असं रौफ ट्विट करत म्हणाला. 

पाहा संपूर्ण व्हिडीओ-

विश्वचषकातील पाकिस्तानची कामगिरी - 

अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या टी20 विश्वचषकात पाकिस्तानचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. गोलंदाजी, फलंदाजी आणि फिल्डिंगमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंना लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तान संघाला चार सामन्यात दोन पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिका आणि भारताने पाकिस्तानचा पराभव केला. पाकिस्तानला दुबळ्या कॅनडा आणि आयर्लंडविरोधात विजय मिळवता आला. आयर्लंडविरोधातही पाकिस्तानचा विजय रडतखडतच झाला.

संबंधित बातम्या:

T20 World Cup 2024: W,0,0,0,0,0,0,0,0,0,0,0,0,W,0,0,0,0,0,W,0,0,0,0; लॉकी फर्ग्युसनचा डोकं फिरवणारा रेकॉर्ड!

T20 World Cup 2026: भारतात रंगणार आगामी टी20 विश्वचषकाचा थरार; अमेरिका, आयर्लंडसह 12 संघ पात्र, पाहा संपूर्ण यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget