Asia Cup 2023: पाकिस्तानला चांगलंच झोंबलं! भारताच्या 'त्या' निर्णयानंतर बोलावली तातडीची बैठक
Jay Shah On Asia Cup 2023: मुंबई (Mumbai) काल (18 ऑक्टोबर) बीसीसीआयची (BCCI) वार्षिक सर्वसाधरण सभा पार पडली.
Jay Shah On Asia Cup 2023: मुंबई (Mumbai) काल (18 ऑक्टोबर) बीसीसीआयची (BCCI) वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांनी भारतीय संघ पुढच्या वर्षी आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार नसल्याची घोषणा केली. तसेच ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवली जावी, अशीही त्यांनी मागणी केली. जय शाह यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आशियाई क्रिकेट परिषदेला तातडीची बैठक बोलावण्याची विनंती केलीय.
ट्वीट-
PCB responds to ACC President's statement
— Pakistan Cricket (@TheRealPCB) October 19, 2022
Read more ➡️ https://t.co/mOLMp4emI3 pic.twitter.com/wjjQQy4IXa
पीसीबीन जाहीर केलेल्या निवेदनात काय म्हटलंय?
"पुढील वर्षी आशिया चषक तटस्थ ठिकाणी आयोजित करण्याबाबत एसीसी अध्यक्ष जय शाह यांच्या वक्तव्यावर पीसीबीने आश्चर्य आणि निराशा व्यक्त केली आहे. आशियाई क्रिकेट बोर्ड किंवा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाशी सल्लामसलत न करता आणि त्यांचे दीर्घकालीन परिणाम आणि प्रभावाचा विचार न करता हा निर्णय घेण्यात आलाय.आशिया चषक हलवण्याचे विधान स्पष्टपणे एकतर्फी आहे. सप्टेंबर 1983 मध्ये एशियन क्रिकेट कौन्सिलची स्थापना ज्या भावनेसाठी झाली होती, हे त्या विरोधात आहे."
बीसीसीआयच्या सर्वसाधारण सभेत जय शाह काय म्हणाले?
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) देशांमधील संबंध सलोख्याचे नसल्याने दोन्ही संघ एकमेंकाचा दौरा करत नाहीत. भारत 2005-06 नंतर एकदाही पाकिस्तानत सामना खेळण्यासाठी गेला नसून आता आगामी आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) पाकिस्तानात होणार आहे. यानंतर भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही अशी स्पष्ट घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली आहे. ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी घ्यावी अशी मागणीही शाह त्यांनी केली.
भारत आणि पाकिस्तान आमने-सामने
ऑस्ट्रेलिया सुरु असलेल्या टी-20 विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे. दरम्यान, हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यातील थरार पाहण्यासाठी दोन्ही देशांतील क्रिकेटप्रेमींमध्ये कमालीची उस्तुकता पाहायला मिळत आहे.
हे देखील वाचा-