(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PAK vs WI: T20 वर्ल्डकपनंतर वेस्ट इंडिज पाकिस्तान दौऱ्यावर जाणार, वेळापत्रक जाणून घ्या
West Indies Tour of Pakistan: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) वेस्ट इंडिज (WI) च्या पाकिस्तान दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. 13 डिसेंबरपासून टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे.
PCB Released WI Series Schedule 2021: ICC T20 विश्वचषक (ICC T20 WC) नंतर, वेस्ट इंडिज (WI) क्रिकेट संघ पाकिस्तानचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) गुरुवारी संध्याकाळी या दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर केले. पीसीबीनुसार, टी-20 मालिका 13 डिसेंबर 2021 पासून सुरू होईल आणि एकदिवसीय मालिका 18 डिसेंबर 2021 पासून सुरू होईल. दोन्ही देशांदरम्यान होणारी ही क्रिकेट मालिका खूपच रोमांचक होईल अशी अपेक्षा आहे, कारण यावेळी पाकिस्तानचा संघ चांगल्या लयीत असल्याचे दिसत आहे.
T20 मालिका कधी खेळली जाणार?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 13 डिसेंबरला होणार आहे. तर दुसरा सामना 14 डिसेंबरला आणि शेवटचा सामना 16 डिसेंबरला होणार आहे. हे सर्व सामने कराचीतील नॅशनल स्टेडियमवर होणार आहेत.
Details of West Indies tour of Pakistan#PAKvWI | #HarHaalMainCricket pic.twitter.com/H5f8Dp2uHA
— Pakistan Cricket (@TheRealPCB) November 4, 2021
वनडे मालिका कधी खेळली जाईल?
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात 18 डिसेंबर 2021 पासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना 18 डिसेंबरला, दुसरा सामना 20 डिसेंबरला आणि तिसरा सामना 22 डिसेंबरला होणार आहे. हे सर्व सामने कराचीतील नॅशनल स्टेडियमवरही होणार आहेत.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची कामगिरी उत्कृष्ट
UAE मध्ये खेळल्या जात असलेल्या ICC T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने शानदार कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. पाकिस्तानने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत चार सामने खेळले असून चारही सामन्यांमध्ये त्यांनी शानदार विजय नोंदवले आहेत. संघाची ही लय कायम राहिल्यास ही स्पर्धा जिंकण्याची शक्यता जास्त आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजची स्पर्धेतील सुरुवात निराशजनक राहिली आहे.