Watch Video: कहा से लाते हो इतना टॅलेंट! चेंडू चमकवण्यासाठी रूटची अनोखी शक्कल, पाहून पाकिस्तानी खेळाडूही झाले थक्क
PAK vs ENG 1st Test: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यातील पहिला कसोटी सामना रावळपिंडी (Rawalpindi) येथे खेळला जातोय.
PAK vs ENG 1st Test: पाकिस्तान आणि इंग्लंड (Pakistan vs England) यांच्यातील पहिला कसोटी सामना रावळपिंडी (Rawalpindi) येथे खेळला जातोय. या सामन्यात फलंदाजांच्या बॅटीमधून धावांचा वर्षाव पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 657 धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघही इंग्लंडला कडवी झुंज देतोय. रावलपिंड स्टेडियममधील खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल आहे. तर, गोलंदांजांना विकेट्स घेण्यासाठी चेंडूवरील चमक कायम ठेवणं गरजेचं आहे. पण आयसीसीच्या नव्या नियमानुसार चेंडूवर लाळ लावण्यावर बंदी घालण्यात आलीय. पण चेंडू चमकवण्यासाठी जो रूटनं (Joe Root) जी शक्कल लढवली, ते पाहून पाकिस्तानचे खेळाडूही हैराण झाले.
पाकिस्तानच्या डावातील 72 षटकात चेंडू जुना झाला होता. त्यावेळी बाबर आझम आणि अझहर अली क्रिजवर होते. अशा परिस्थितीत चेंडूला जीवदान देण्यासाठी त्याला चमकवणं गरजेचं होतं. आयसीसीच्या नियमांनुसार, लाळेचा वापर करण्यास बंदी घालण्यात आलीय. म्हणूनच इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटनं नवी शक्कल लढवली. जो रूटनं त्याचा सहकारी जॅक लीच याला त्याच्याकडं बोलावलं आणि अचानक त्याची कॅप काढली. त्यानंतर त्यानं चेंडू लीचच्या डोक्यावरून फिरवला, ज्यामुळं घामानं बॉलमध्ये चमकेल. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. तसेच समालोचक आणि पाकिस्तानच्या खेळाडूंनाही हसू आवरता आलं नाही.
व्हिडिओ-
"Absolutely ingenious!"
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 3, 2022
Root finds a unique way of shining the ball with the help of Leach 🤝😅#PAKvENG | #UKSePK pic.twitter.com/mYkmfI0lhK
इमाम-उल-हक आणि अब्दुल्ला शफीक शतक झळकावून बाद
इंग्लंडनं पहिल्या डावातील विशाल धावसंख्येनंतर मैदानात आलेल्या अब्दुला शफीकनं इंझमाम-उल-हकसोबत मजबूत भागीदारी केली. दोघांनीही या सामन्यात शतक झळकावून पाकिस्तानचा डाव पुढं घेऊन जाण्यास मदत केली. अब्दुल्लाह शफीक 114 धावांवर असताना विल जॅकच्या गोलंदाजीवर बाद झाला. तर, इमाम-उल-हकही 121 धावा करुन माघारी परतला.
पाकिस्तानचा संघ:
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, अझहर अली, बाबर आझम (कर्णधार), सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेरकिपर), आगा सलमान, नसीम शाह, हरिस रौफ, मोहम्मद अली, जाहिद महमूद.
इंग्लंडचा संघ:
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (विकेटकिपर), जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, विल जॅक्स, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.
हे देखील वाचा-