NZ vs PAK: बाबर आझम पुन्हा झाला सुरू; विराटचा आणखी एक विक्रम मोडला, रोहित शर्मालाही टाकलं मागं!
New Zealand T20I Tri-Series 2022: न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात ट्राय सिरीज खेळण्यात आली. या सिरीजच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या संघानं न्यूझीलंडचा पाच विकेट्सनं पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरलं.
New Zealand T20I Tri-Series 2022: न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात ट्राय सिरीज खेळण्यात आली. या सिरीजच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या संघानं न्यूझीलंडचा पाच विकेट्सनं पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरलं. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून खराब फॉर्मशी झुंजणारा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) पुन्हा फॉर्ममध्ये आलाय. या मालिकेत बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात बाबरनं 40 चेंडूत 55 धावांची अर्धशतकीय खेळी केली. या कामगिरीसह बाबरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक विक्रमाला गवसणी घातलीय. बाबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावांचा टप्पा गाठणारा आशियाई खेळाडू ठरलाय.
विराटचा कोणता विक्रम मोडला?
बाबर आझमनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 11 हजार धावांचा टप्पा गाठलाय. त्यानं 251 डावात हा पराक्रम केलाय. यासह बाबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 11 हजार धावांचा टप्पा गाठणारा आशियाई खेळाडू ठरलाय. बाबरपूर्वी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला होता. विराटनं 261 डावात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 11 हजार धावा पूर्ण केल्या. या यादीत भारताचा माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 262 डावात 11 हजार धावा केल्या. त्यानंतर 266 डावासह पाकिस्तानचा जावेद मियांदाद या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
ट्वीट-
Babar Azam Today
— Hunain | BA56 FAN 🇵🇰 (@hunainsaleh258) October 13, 2022
29th T20I fifty ✅
11000 Career runs ✅
Fastest Asian To 11000 Career Runs ✅
100 Fifty Plus scores in Career ✅
The BIG ONE dominating cricket.#BabarAzam𓃵 pic.twitter.com/qCfi2aRgNy
रोहित शर्मालाही टाकलं मागं
बांग्लादेशविरुद्ध सामन्यात बाबरनं त्याच्या टी-20 कारकिर्दीतील 29वं शतक झळकावलं. तसेच तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत टॉपवर पोहचलाय. या कामगिरीसह त्यानं भारताचा कर्णधार रोहित शर्माला मागं टाकलं आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर 28 शतकांची नोंद आहे.
बाबर आझमची कारकिर्द
बाबरनं पाकिस्तानसाठी 42 कसोटी सामन्यांच्या 75 डावांमध्ये 3 हजार 122 धावा, 92 एकदिवसीय सामन्यांच्या 90 डावांमध्ये 4 हजार 664 धावा आणि 91 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या 86 डावांमध्ये 3 हजार 216 धावा केल्या आहेत. अशाप्रकारे बाबरनं 251 डावांमध्ये 11 हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या आहेत. बाबर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, तो आगामी विश्वचषकातही अप्रतिम फलंदाजी करून विरोधी संघाला अडचणीत आणू शकतो.
हे देखील वाचा-