New Zealand: न्यूझीलंडचा मास्टर प्लॅन! पुढील तीन दौऱ्यासाठी विल्यमसनला विश्रांती; संघात कधी परतणार?
New Zealand Cricket Board: इंग्लंडदौऱ्यानंतर न्यूझीलंडच्या संघ आयर्लंड, नेदरलँड्स आणि स्कॉटलँड दौरा करणार आहे.
New Zealand Cricket Board: इंग्लंडदौऱ्यानंतर न्यूझीलंडच्या संघ आयर्लंड, नेदरलँड्स आणि स्कॉटलँड दौरा करणार आहे. या दौऱ्यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डानं 15 सदस्यीय संघाची घोषणा केलीय. दरम्यान, न्यूझीलंडच्या पुढील तिन्ही दौऱ्यात कर्णधार केन विल्यमसनला विश्रांती देण्यात आली. आयर्लंडमध्ये 10 जुलैपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेची कमान टॉम लॅथमकडं सोपवण्यात आली. तर, टी-20 संघाची जबाबदारी फिरकीपटू मिचेल सँटनरकडं देण्यात आली आहे. आयर्लंड, नेदरलँड्स आणि स्कॉटलँडविरुद्ध क्रिकेट खेळल्यानंतर न्यूझीलंडचा संघ वेस्ट इंडीजविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत केन विल्यमसनचं संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंडचे पुढील तीन दौरे
आयर्लंडविरुद्ध दौऱ्यात न्यूझीलंडचा संघ तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ नेदरलँड्सचा दौरा करेल. तिथे तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळेल. नेदरलँड्सनंतर न्यूझीलंडचा संघ स्कॉटलँडला रवाना होईल. या दौऱ्यात न्यूझीलंड स्कॉटलँडशी तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. दरम्यान, खेळाडूंनी फिट राहणं महत्वाचं आहे. यामुळं केन विल्यमसन, ट्रेन्ट बोल्ट आणि टॉम लॅथमला विश्रांती देण्यात आलीय, असं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानं अहवालात म्हटलं आहे.
ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडीजचा दौरा
इंग्लंडविरुद्ध तिसरी कसोटी मालिका खेळल्यानंतर केन विल्यमसन, ट्रेन्ट बोल्ट आणि टॉम लॅथम न्यूझीलंडला रवाना होतील. त्यानंतर ऑगस्टमध्ये होणाऱ्या टी-20 मालिकेत या खेळाडूंचं संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे. यामुळं या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
न्यूझीलंडचा संघ-
टॉम लाथम (कर्णधार), फिन एलन, माइकल ब्रेसवेल, डेन क्लीवर, जॅकब डफी, लॉकी फर्ग्यूसन, मार्टिन गप्टिल, मॅट हेनरी, एडम मिल्ने, हेनरी निकोलस, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोढी, ब्लेयर टिकर, विल यंग.
हे देखील वाचा-