Birmingham Test: तेलही जाईल अन् तूपही! डब्लूटीसी गुणतालिकेसाठी बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतासाठी किती महत्वाचा?
Birmingham Test: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळणार आहे.
![Birmingham Test: तेलही जाईल अन् तूपही! डब्लूटीसी गुणतालिकेसाठी बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतासाठी किती महत्वाचा? How important is the Birmingham Test match for Team India in the WTC Point table? Birmingham Test: तेलही जाईल अन् तूपही! डब्लूटीसी गुणतालिकेसाठी बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतासाठी किती महत्वाचा?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/20/0806ddc4710ac8f388d79a2eafea208a_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Birmingham Test: रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरचा सामना खेळणार आहे. बर्मिंगहॅम येथे 1-5 जून दरम्यान हा सामना खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून भारताकडं इतिहास रचण्यासाठी संधी उपलब्ध झालीय. एवढेच नव्हेतर, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलच्या शर्यतीसाठी भारतासाठी हा सामना अतिशय महत्वाचा असेल. हा सामना गमावल्यास भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) गुणतालिकेत मोठं नुकसान होऊ शकतं. पराभवानंतर भारताची या डब्लूटीच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर घसरण होऊ शकते.
बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतासाठी किती महत्वाचा?
बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतासाठी किती महत्वाचा आहे? हे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. "बर्मिंगहॅम कसोटी सामना जिंकण्या व्यतिरिक्त वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशी गुणतालिका भारतीय संघासाठी महत्वाची असणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ जोर लावेल." डब्ल्यूटीसी गुणतालिकेतील भारताचं स्थान साधारणता श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेवर अवलंबून राहणार आहे.
डब्लूटीसीच्या गुणतालिकेत भारत तिसऱ्या क्रमांकावर
डब्लूटीसीच्या गुणतालिकेत भारतीय संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतानं 58.33 टक्के मालिका जिंकली आहे. तर, श्रीलंकेच्या संघानं 55.56 टक्के विजय मिळवला आहे. दरम्यान, 40 गुणांसह श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकल्यास आणि भारत इंग्लंडविरुद्ध पराभूत झाल्यास श्रीलंका तिसऱ्या क्रमांकावर झेप घेईल. यामुळं ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्यासाठी श्रीलंकेचा संघ मैदानात उतरणार आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा संघ गेल्या 15 वर्षांपासून आशियामध्ये फक्त तीन कसोटी सामने जिंकलाय.
श्रीलंकाविरुद्ध ऑस्ट्रेलिया जिंकल्यास काय होणार?
डब्लूटीसीच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर कायम राहण्यासाठी भारताला इंग्लंडला पराभूत करणं गरजेचं आहे. दरम्यान, श्रीलंकेला पराभूत केल्यास ऑस्ट्रेलियाचा संघ डब्लूटीसीच्या गुणतालिकेतील अव्वल स्थान मजबूत करेल.
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)