एक्स्प्लोर

निवृत्तीनंतर पुन्हा मैदानात उतरु शकतो 'हा' दिग्गज फलंदाज;  टी20 फॉर्मेटमध्ये खेळण्याची शक्यता

Latest Sport News: नवनवीन क्रिकेटपटू जगासमोर येत असले तरी काही दिग्गज खेळाडूंचा खेळ आजही क्रिकेटप्रेमी विसरलेले नाहीत, ज्यांच्या पुनरागमनाची आशा कायम क्रिकेट रसिकांना असते.

Ross Taylor Comeback : न्यूझीलंड क्रिकेट टीमचा एक दिग्गज फलंदाज रॉस टेलरने (Ross Taylor) काही दिवसांपूर्वीच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. पण आता रॉस पुन्हा एकदा मैदानावर पुनरागमन करण्याची चिन्ह दिसत आहेत. तो टी20 क्रिकेट फॉर्मेटमध्ये पुन्हा खेळू शकतो. याबाबत त्याने स्वत:च प्रतिक्रिया दिली आहे. 

नुकताच न्यूझीलंड क्रिकेटकडून त्याला एक खास सन्मान देण्यात आला. यावेळी बोलताना त्याने आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, "जर मला कोचिंग करण्याची संधी मिळाली, तर मी करु शकतो. पण कोचिंग सोबत अजूनही माझ्यात खेळण्याची इच्छा नक्कीच आहे.'' टेलरच्या या वक्तव्यातून तो पुन्हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यात दिग्गज खेळाडू विविध देशांच्या टी20 लीगमध्ये खेळत असल्याने टेलरही टी20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करु शकतो. 

रॉस टेलरचं 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
रॉस टेलरनं 2006 मध्ये न्यूझीलंडकडून पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्यानंतर काही महिन्यांनी त्याला कसोटी क्रिकेटमध्ये पदापर्ण करण्याची संधी मिळाली. टेलरनं 236 एकदिवसीय सामन्यांमध्ये 8,593 धावा आणि 102 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1,909 धावा केल्या आहेत. त्यानं आतापर्यंत 112 कसोटी सामने खेळले. ज्यात त्यानं 7,683 धावा केल्या आहेत. ज्यात 19 शतकाचा समावेश आहे. 

शेवटच्या सामन्यात रॉस टेलर 14 धावांवर बाद
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा टेलर हा जगातील एकमेव खेळाडू आहे. शेवटच्या सामन्यात त्याला क्रीजवर येण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली. मार्टिन गप्टिल आणि विल यंग यांच्या दुसऱ्या विकेटसाठी 203 धावांच्या भागीदारीमुळं त्याला 39व्या षटकात क्रीझवर यावं लागलं. तो मैदानातच येताच उपस्थितांनी उभे राहून त्यांचे स्वागत केलं. 14 धावांवर बाद झाल्यानंतर तो पॅव्हेलियनमध्ये परतत असताना त्याच्या चेहऱ्यावर मंद हास्य होतं.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadanvis Interview : भारत जोडो ते संविधान; महायुती ते मविआ; फडणवीसांची स्फोटक मुलाखतCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM :15 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Chandwad Vidhan Sabha Constituency : चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
चांदवडमध्ये राहुल आहेर गड राखणार की केदा आहेर, शिरीष कोतवाल धक्का देणार? 
Ajit Pawar: फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
फडणवीसांना काय वाटतं मला माहिती नाही, पण मला 'बटेंगे तो कटेंगे' पसंत नाही; अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
Embed widget